D2M Phone : मोबाईल क्षेत्रात क्रांती! इंटरनेटशिवाय मोफत ‘Live TV’ चालणारा जगातील पहिला फोन भारतात येणार
D2M Phone : दक्षिण कोरियातील नामांकित खुशटेक (KhushTech Korea) कंपनीने मोबाईल डेटा, इंटरनेट किंवा वाय-फाय (Wi-Fi) नसतानाही थेट फ्री-टू-एअर लाईव्ह टीव्ही (Free Live TV) दाखवणारा जगातील पहिला D2M (Direct-to-Mobile) फीचर फोन विकसित केला आहे.

D2M Phone : मोबाईल तंत्रज्ञानात मोठी क्रांती घडवणारा जगातील पहिला D2M (Direct-to-Mobile) फीचर फोन लवकरच भारतात दाखल होणार आहे. दक्षिण कोरियातील खुशटेक (KushTech Korea) कंपनीने हा फोन विकसित केल्याचा दावा केला असून, इंटरनेट किंवा वाय-फायशिवाय थेट फ्री लाईव्ह टीव्ही पाहण्याची सुविधा हे या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. (D2M Phone)
कंपनीच्या माहितीनुसार, फोनमध्ये इन-बिल्ट अँटेना देण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईल डेटा, इंटरनेट किंवा Wi-Fi नसतानाही टीव्हीचे सिग्नल थेट प्राप्त होऊन लाईव्ह चॅनेल पाहता येतील. हे तंत्रज्ञान विशेषतः इंटरनेट सुविधा कमी असलेल्या भागांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. (D2M Phone)
D2M तंत्रज्ञान म्हणजे काय?
या फोनमध्ये ATSC 3.0 आधारित Direct-to-Mobile (D2M) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे मोबाईल नेटवर्क किंवा इंटरनेटशिवाय ब्रॉडकास्ट सिग्नलद्वारे थेट टीव्ही चॅनेल पाहता येतात. भारतातही या तंत्रज्ञानाच्या चाचण्या सुरू असून, भविष्यातील प्रसारण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणून त्याकडे पाहिले जात आहे. (D2M Phone)
फोनची प्रमुख वैशिष्ट्ये
2.4 इंच QVGA TFT डिस्प्ले
320×240 पिक्सेल रिझोल्यूशन
2G आणि 4G LTE नेटवर्क सपोर्ट
ड्युअल नॅनो सिम स्लॉट
ThreadX ऑपरेटिंग सिस्टीम
Unisoc UMS9117-L प्रोसेसर
64MB RAM आणि 128MB इंटरनल स्टोरेज
मायक्रोSD कार्डद्वारे 128GB पर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
कॅमेरा आणि बॅटरी
फोनच्या मागील बाजूस 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा आणि LED टॉर्च देण्यात आला आहे. यामध्ये 1800mAh रिमुव्हेबल बॅटरी असून, USB Type-C पोर्टद्वारे 2.5W चार्जिंग सपोर्ट मिळतो. याशिवाय फोनमध्ये Bluetooth 5.0, FM Radio, 3.5mm हेडफोन जॅक, 0.8W मोनो स्पीकर अशी सुविधाही देण्यात आली आहे. (D2M Phone)
डिजिटल पेमेंट आणि Live TV अॅप्स
कंपनीच्या म्हणण्यानुसार, फोनमध्ये कॉलिंग, लाईव्ह टीव्ही, डिजिटल पेमेंट आणि इतर आवश्यक अॅप्स आधीपासूनच उपलब्ध असतील. (D2M Phone)
लवकरच बाजारात
सध्या हा D2M फीचर फोन उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात असून, लवकरच भारतीय बाजारात लॉन्च केला जाणार आहे. तसेच लावा आणि नोकिया यांसारख्या कंपन्याही D2M तंत्रज्ञानावर आधारित फीचर फोन विकसित करत असल्याची माहिती समोर आली आहे. (D2M Phone)





