satara | पाचगणीत विविध उपक्रमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा

भिलार, (प्रतिनिधी) – पाचगणीत स्वच्छता करणे, झाडे लावणे उपक्रम राबवून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यामध्ये संत निरंकारी संप्रदाय, पाचगणी नगरपालिका व अंजुमन इस्लाम पब्लिक स्कूल यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
अंजुमन इस्लाम पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाबद्दल जनजागृतीसाठी रॅली काढून आपला संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. 5 जून रोजी सकाळी अंजुमन इस्लाम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाचगणीच्या शिवाजी चौक येथे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देणारी सभा घेतली. शिक्षक व विद्यार्थ्यांनी रॅली काढून पर्यावरण व निसर्ग रक्षण करण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा दिल्या.
अंजुमन इस्लाम मुंबईचे सीईओ शगफ नकीद यांनी पत्नीसमवेत विद्यार्थ्यांसह वृक्षारोपण केले. शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रांगणात फळझाडे लावली व लावलेल्या झाडांचे रक्षण करण्याची शपथ घेतली.
मुख्याध्यापिका श्रीमती अफरोज खान म्हणाल्या, शाळांनी लहान वयातच मुलांमध्ये वृक्षसंवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचा जपून वापर करण्याबद्दल जागृती निर्माण गरजेचे आहे. वृक्षारोपणासाठी क्रीडा शिक्षक निकम व शाळेचे माळी नरेंद्र, उत्तम, नितीन, रोहन यांनी सहकार्य केले





