यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

पिंपरी – यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी व्यक्ती, संस्था आणि समूह या सर्वांचा सक्रिय सहभाग वाढवा,यासाठी 1972 सालापासून संयुक्त राष्ट्र संघाने 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन घोषित केला.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपणावर भर द्यायला हवा,असे मत यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. मधुरा देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. गंगाधर डुकरे यांनी केले. यावेळी एमबीए विद्या शाखेच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश रांगणेकर
मोबाईल : 7350014536 / 9325509870
ज्ञानेश्वर गोफण (माऊली)
मोबाईल :7083474883 / 7620603256





