अवकाश संशोधनाबाबतची जागतिक परिषद सुरू
Updated On:

बुसान (दक्षिण कोरिया) – अंतराळातील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संशोधनाला चालना देण्यासाठी आज दक्षिण कोरियाच्या बुसान शहरात अंतराळ संशोधनावरील जागतिक परिषद सुरू झाली.
कोरिया एरो स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या मतानुसार ६० देशांमधील सुमारे ३ हजार अंतराळ शास्त्रज्ञ आणि उद्योग अधिकारी अंतराळ संशोधन समितीच्या ४५ व्या वैज्ञानिक संमेलनात सहभागी झाले आहेत. दक्षिण कोरिया प्रथमच द्विवार्षिक जागतिक परिषदेचे आयोजन करत आहे.
अनेक कोरियन कंपन्यांकडे जागतिक अंतराळ बाजारपेठेत स्पर्धा करण्याची क्षमता आहे आणि कोरियाच्या अंतराळ संस्थेने त्यांना खाजगी उद्योगांना अवकाश विकासात आघाडीवर ठेवण्यास मदत करण्यासाठी भरपूर पाठिंबा देण्याची योजना आखली आहे, असे यजमान कोरिया अंतराळ संस्थेच्यावतीने याप्रसंगी सांगण्यात आले.





