कॉंग्रेसतर्फे कार्यकर्ता शिबिर

नगर – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर कॉंग्रेसतर्फे जिल्ह्यात तालुकानिहाय कॉंग्रेस कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 22 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत हे शिबिर होणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली.

एक दिवसाचे शिबिरामध्ये युवक, सेवा दल, महिला, विद्यार्थी, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहतील. शिबिरांतर्गत कॉंग्रेसची विचारधारा, निवडणूक व्यवस्थापन व युती सरकारची पोलखोल करणाऱ्या विविध विषयावर मार्गदर्शन देण्यात आहे.

दि. 22 रोजी सकाळी 10 वा. जामखेड तर दुपारी 2 वा माहीजळगाव, कर्जत. दि.26 सकाळी 10 वा. भाळवणी, पारनेर तर दुपारी 2 वा. नगर तालुका. दि 27 ला सकाळी 10 वा. पाथर्डी तर दुपारी 2 वा. शेवगाव, दि 28 रोजी सकाळी 10 वा. राहुरी तर दुपारी 2 वा. श्रीरामपूर, दि. 29 रोजी सकाळी 10 वा. श्रीगोंदा तर दुपारी 2 वा. नगर शहर, दि 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. अकोले तर दुपारी 2 वा.संगमनेर, दि 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. राहाता तर दुपारी 02 वा. कोपरगाव. प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करण्यासाठी कॉंग्रेसचे सचिव डॉ. वामशीचंद रेड्डी, आ.डॉ.सुधीर तांबे, प्रदेश कॉंग्रेसचे प्रशिक्षक योगेंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×