Satara | शिक्षण क्षेत्राचा नावलौकिक वाढवण्याचे काम करा

सातारा, (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेने राबवलेल्या पदोन्नती प्रक्रियेमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व वरिष्ठ मुख्याध्यापक या पदांवर विराजमान झालेले नवनियुक्त अधिकारी व मुख्याध्यापकांनी कोरेगाव तालुक्यातील शिक्षण क्षेत्राचा नावलौकिक वाढेल असे कार्य करावे, असे आवाहन अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कोषाध्यक्ष, शिक्षक नेते सिद्धेश्वर पुस्तके यांनी केले.
कोरेगाव तालुका शिक्षक संघाच्यावतीने आयोजित नवनियुक्त विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. कोरेगाव तालुक्यास असलेला शैक्षणिक परंपरेचा वारसा नवनियुक्त अधिकाऱ्यांनी जतन करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी राज्य संघाचे सल्लागार रामचंद्र लावंड, वसंतराव हारगुडे, तुकाराम कदम, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे, राज्य उपाध्यक्ष विष्णुपंत खताळ, माजी संचालक दादासाहेब सरकाळे,
मोहन निकम, हिंमत जगताप, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या राज्य कोषाध्यक्षा शाबिरा मुल्ला यांच्या हस्ते शिक्षण विस्तार अधिकारी अनिल पाटील व संगीता नलवडे, केंद्रप्रमुख संतोष लेंभे, हणमंत खिलारे,
शिवाजी तावरे, राजेंद्र झांजुर्णे, विठ्ठल स्वामी, धनाजी पवार, प्रवीण गायकवाड, अनिता सूर्यवंशी, वंदना गंगावणे तसेच वरिष्ठ मुख्याध्यापक मधुकर घार्गे, प्रमोद बावकर, किशोर गायकवाड, राजकुमार गडकरी, राजेंद्र चोरगे, किशोर गायकवाड, राजेंद्र कर्पे, लतिका कर्पे, जयमाला डिंगणे, मंगल शिंदे, मंदाकिनी फरांदे, वंदना देशमाने, कविता सरकाळे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कोरेगाव तालुक्यात बदलीने आलेले शिक्षक दादासो थोरात, संतोष कोळी, संताजी घोरपडे, वनिता नलगे, किरण झेंडे, प्रथमेश वायदंडे व विनोद बोरुडे यांचे स्वागत करण्यात आले. सेवानिवृत्त शिक्षक दादासाहेब सरकाळे, दशरथ घोरपडे, सुनीता तारळकर, नंदा सोनवणे, सुरेखा निकम, यशवंत जमदाडे, अरुण साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला.
तुकाराम कदम, विष्णुपंत खताळ, महेंद्र जानुगडे, तालुकाध्यक्ष अरुण घोरपडे, महिला आघाडी अध्यक्ष नंदा माने यांनी मनोगत व्यक्त केले. सत्कारमूर्तींच्यावतीने शिक्षण विस्ताराधिकारी संगीता नलवडे, केंद्रप्रमुख राजेंद्र झांजुर्णे व वरिष्ठ मुख्याध्यापक मधुकर घार्गे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमास जिल्हा संघाचे संतोष जगताप, रुपेश जाधव, माजी तालुकाध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड, बजरंग वाघ, शिक्षक भरतीचे तालुकाध्यक्ष प्रशांत देशमाने, सुभाष जाधव, हणमंत बागाव, विनोद बुधावले, किशोर मतकर,अविनाश जाधव,
सतीश चव्हाण, बाळकृष्ण पवार, रमेश चव्हाण, सचिन जाधव, कुमार उदांडे, शांताराम वाघ, वैभव दिसले, नेहा कुलकर्णी, किरण भांडवलकर, स्नेहल झेंडे, रंजना कदम, वैशाली मतकर, निर्मला सानप, अपर्णा कुमठेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
तालुका शिक्षक संघाचे नेते प्रमोद देशमुख यांनी प्रास्ताविक केले. महिला आघाडी संघटक वैशाली बागाव यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस प्रवीण गायकवाड यांनी आभार मानले.





