Women’s T20I Batting Rankings : टी-20 विश्वचषक 2024 दरम्यान ICC कडून क्रमवारी जाहीर, हरमनप्रीत अन् श्रेयंकाने घेतली मोठी झेप…

ICC Women’s T20I Batting Rankings : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मंगळवारी आयसीसी महिला टी-20 फलंदाजी क्रमवारीत चार स्थानांचा फायदा झाला आहे. यासह ती 12व्या स्थानावर पोहोचली आहे. हरमनप्रीतसोबतच 12व्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेच्या हर्षिता समरविक्रमाचेही 610 रेटिंग गुण आहेत.
ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी 761 रेटिंग गुणासह पहिल्या तर ताहलिया मॅकग्रा 748 रेटिंग गुणासह स्थानावर कायम आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर लॉरा वोल्वार्ड (तीसरा क्रमांक) आणि ताजमिन ब्रिट्स (सहा क्रमांक) या दोघांनीही आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी गाठली आहे.
अन्य भारतीयामध्ये स्मृती मानधना एका स्थानाने घसरून 736 रेटिंग गुणासह पाचव्या स्थानावर तर जेमिमाह रॉड्रिग्स दोन स्थानांनी घसरून 596 रेटिंग गुणासह 20व्या स्थानावर आली आहे. तर भारताची युवा फलंदाज शेफाली वर्मा 627 गुणासह अकाराव्या स्थानी कायम आहे.
.@sadiaiqbal45 briefly held the top spot in the ICC Women’s T20I bowling rankings last week and is now ranked No. 2! 🌟
She is the leading wicket-taker in WT20Is in 2024 among bowlers at the ICC Women’s #T20WorldCup ☄️#BackOurGirls pic.twitter.com/m6PSpabU8X
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 8, 2024
गोलंदाजीत श्रेयंकाची नऊ स्थानांनी झेप…
दुसरीकडे, गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताची ऑफस्पिनर श्रेयंका पाटील नऊ स्थानांनी प्रगती करत 585 गुणासह 29व्या स्थानावर पोहचली आहे. अनुभवी ऑफस्पिनर दीप्ती शर्मा (738) दोन स्थानांनी घसरून चौथ्या स्थानावर तर वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर (718) पाचव्या स्थानावर कायम आहे. राधा यादव तीन स्थानांनी घसरून 652 रेटिंग गुणासह संयुक्तपणे 15 व्या स्थानावर पोहचली आहे.
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2024 दरम्यान ही क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. काही काळ क्रमवारीत अव्वल असलेली पाकिस्तानची फिरकीपटू सादिया इक्बाल (754 रेटिंग गुण) दुसऱ्या स्थानावर घसरली जेव्हा इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनने (762 रेटिंग गुण) तिला मागे टाकून पुन्हा अव्वल स्थान पटकावले.





