Women T20 World Cup 2024 Schedule :- महिला क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून दुबई आणि शारजाह इथं सुरुवात होणार आहे. आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं काल विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. महिला टी-20 विश्व करंडक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत आणि पाकिस्तान हे संघ 6 ऑक्टोबर रोजी आमनेसामने असणार आहेत.
आयसीसीने आपल्या वेबसाईटवर स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक सोमवारी जाहीर केले. बांगलादेशमध्ये उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे ही संपूर्ण स्पर्धा दुबई व शारजाह येथे हलविण्यात आली आहे. स्पर्धेत भारतीय संघ दोन सराव सामने खेळल्यानंतर मुख्य स्पर्धेत उतरणार आहे. भारताची सलामीची लढत न्यूझीलंड संघाबरोबर 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी भारतीय संघ पाकिस्तान संघासोबत दोन हात करणार आहे. 9 ऑक्टोबर रोजी श्रीलंका व 13 ऑकटोबर रोजी ऑस्ट्रेलियाचे आव्हान भारताच्या महिला संघासमोर असणार आहे.
महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या दहा संघांची विभागणी दोन गटांमध्ये करण्यात आली आहे. अ गटात भारतीय संघाचा समावेश करण्यात आला असून भारताच्या बरोबरीने न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका व सहा वेळेस विजेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलिया संघ असणार आहे. ब गटात बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व स्कॉटलंड या संघाचा समावेश करण्यात आला आहे.
𝗠𝗮𝗿𝗸 𝗬𝗼𝘂𝗿 𝗖𝗮𝗹𝗲𝗻𝗱𝗮𝗿 🗓️#TeamIndia‘s schedule for the ICC Women’s #T20WorldCup 2024 is 𝙃𝙀𝙍𝙀 🔽 pic.twitter.com/jbjG5dqmZk
— BCCI Women (@BCCIWomen) August 26, 2024
दोन्ही गटातील टॉप 2 संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र होणार आहेत. पहिला उपांत्य फेरीची लढत दुबई येथे तर दुसरी उपांत्य फेरीची लढत शारजाह येथे खेळविण्यात येणार आहे. उपांत्य फेरीतील विजयी संघ 20 ऑक्टोबर रोजी दुबई येथे विजेतेपदासाठी भिडतील. 17 आणि 18 ऑक्टोबरला विश्वचषकाचे उपांत्य सामने खेळले जाणार आहेत. तर 20 ऑक्टोबरला अंतिम सामना होईल.
Duleep Trophy 2024 : जडेजा, सिराज आणि उमरान मलिक दुलीप ट्रॉफीमधून बाहेर! समोर आलं ‘हे’ कारण….
भारतीय महिला संघाच्या लढती :
4 ऑक्टोबर 2024 – भारत वि न्यूझीलंड : दुबई
6 ऑक्टोबर 2024 – भारत वि पाकिस्तान : दुबई
9 ऑक्टोबर 2024 – भारत वि श्रीलंका : दुबई
13 ऑक्टोबर 2024 – भारत वि ऑस्ट्रेलिया : शारजाह