Duleep Trophy 2024 : जडेजा, सिराज आणि उमरान मलिक दुलीप ट्रॉफीमधून बाहेर! समोर आलं ‘हे’ कारण….

Duleep Trophy 2024 : दुलीप करंडक स्पर्धा येत्या 5 सप्टेंबर 2024 पासून अनंतपूर, आंध्र प्रदेश आणि एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे सुरू होणार आहे. याआधी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि उमरान मलिक पहिल्या फेरीतून बाहेर झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने याबाबत माहिती दिली आहे. जडेजा टीम ‘बी’ कडून खेळणार होता. मात्र त्या रिलीज करण्यात आले आहे. सिराज आणि उमरान आजारपणामुळे खेळू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागी नवदीप सैनी आणि गौरव यादव यांना संधी देण्यात आली आहे.
सिराजच्या जागी नवदीपला संधी…
वेगवान गोलंदाज सिराजचा ‘बी’ टीममध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र आता आजारपणामुळे तो खेळू शकणार नाही. ‘बी’ टीममध्ये सिराजच्या जागी नवदीप सैनीला संधी देण्यात आली आहे. नवदीप हा अनुभवी गोलंदाज असून त्याने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. अभिमन्यू ईश्वरनच्या नेतृत्वाखाली नवदीप टीम ‘बी’ मध्ये खेळणार आहे. नवदीपच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली, तर त्याने भारतासाठी 8 वनडे सामने खेळले आहेत. त्याने 2 कसोटी आणि 11 टी-20 सामनेही खेळले आहेत. त्याने लिस्ट ए मध्ये 101 आणि फर्स्ट क्लासमध्ये 184 विकेट्स घेतल्या आहेत.
उमरानच्या जागी गौरवला स्थान…
उमरान मलिकबद्दल सांगायचे तर, तो रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली टीम ‘सी’ चा एक भाग होता. उमराणही आजारी आहे. त्यामुळे तो खेळू शकणार नाही. उमरानच्या जागी गौरव यादवला टीम ‘सी’ मध्ये स्थान मिळाले आहे. गौरवने 37 प्रथम श्रेणी सामन्यात 141 बळी घेतले आहेत. त्याने 23 लिस्ट ए सामन्यात 48 विकेट घेतल्या आहेत. गौरव आता सूर्यकुमार यादव आणि गायकवाड यांसारख्या दिग्गज खेळाडूंसोबत खेळणार आहे.
जडेजाच्या रिलीज कारण अद्याप अस्पष्ट …
बीसीसीआयकडून रविंद्र जडेजाच्या रिलीजचे कारण सांगण्यात आलेले नाही तसेच त्याच्या बदली खेळाडूचे नावही अद्याप समोर आलेले नाही. नितीश कुमार रेड्डी याचा स्पर्धेतील सहभाग फिटनेस क्लिअरन्सवर अवलंबून असल्याचेही बीसीसीआयने म्हटले आहे.
Test Cricket : कसोटीत परतणार विश्रांतीचा दिवस, ‘या’ दोन संघातील सामना 5 नव्हे 6 दिवसांचा होणार…
दुलीप ट्रॉफी 2024 अपडेटेड संघ –
भारत ‘..बी’ संघ : अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), यशस्वी जयसवाल, सरफराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी*, वाशिंगटन सुंदर, नवदीप सैनी, यश दयाल, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी , एन जगदीसन.
भारत ‘सी’ संघ : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, बी इंद्रजीत, रितिक शौकीन, मानव सुथार, गौरव यादव, विशाक विजयकुमार, अंशुल खंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंडे, आर्यन जुयाल, संदीप वारियर.





