Women’s T20 World Cup 2024 : पाकचा भारताविरूध्द फलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघात महत्वपूर्ण 1-1 बदल, जाणून घ्या Playing XI….

Women’s T20 World Cup 2024 : महिला विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हरमनप्रीत कौरचा संघ या सामन्यात पहिला विजय नोंदविण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी स्पर्धेतील या सामन्यात पाकिस्तानचे दुसऱ्या विजयाचे लक्ष्य असेल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील हा सामना दुबईत होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान टी-20 मध्ये आतापर्यंत एकूण 15 वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध भारताचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. भारताने पाकिस्तानला 12 वेळा पराभूत केले आहे, तर पाकिस्तान संघाला भारतीय संघाविरुद्ध तीन वेळा यश मिळाले आहे.
या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी, टी-20 विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानच्या कर्णधाराने सांगितले की, आम्ही प्रथम फलंदाजी करू आणि स्करेबोर्डवर एक मोठी टोटल लावण्याचा प्रयत्न करू.डायना बेग आज खेळत नाही आहे. हा एकच बदल आहे. हा मोठा धक्का आहे, पण आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे तिच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी करू शकतात. तर दुसरीकडे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, भारतीय संघ एका बदलासह या सामन्यात दाखल झाला आहे. पूजा वस्त्राकर दुखापतीमुळे बाहेर आहे.
T20WC 2024. Pakistan won the toss and elected to bat. https://t.co/RO22EEPmAM #INDvPAK #T20WorldCup #WomenInBlue
— BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2024
दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे…..
भारत : स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (C), जेमिमा रोड्रिग्स, ऋचा घोष (Wk), दीप्ति शर्मा, अरुंधति रेड्डी, सजीवन सजना, श्रेयंका पाटिल, आशा शोभना, रेणुका ठाकुर सिंह.
🚨 Toss and Team Update 🚨
Pakistan win the toss in Dubai, #TeamIndia will bowl first.
One change in our Playing XI for today.
Follow the match ▶️ https://t.co/eqdkvWVK4h#T20WorldCup | #INDvPAK | #WomenInBlue pic.twitter.com/Df11raQ00K
— BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2024
पाकिस्तान : मुनीबा अली (Wk), गुल फिरोजा, सिदरा अमीन, निदा डार, आलिया रियाज, ओमैमा सोहेल, फातिमा सना (C), तुबा हसन, नशरा संधू, सैयदा अरूब शाह, सादिया इकबाल.
भारत-पाक सामना कधी आणि कुठे बघायचा..
भारत विरुद्ध पाकिस्तान महिला T20 विश्वचषक 2024 सामना भारतात डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या टीव्ही चॅनेलवरही तुम्ही हा सामना भारतात टीव्हीवर थेट पाहू शकता.
भारताला विजय आवश्यक….
महिला टी-20 विश्वचषकात आमनेसामने येण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान या संघांनी स्पर्धेत प्रत्येकी एक सामना खेळला आहे. टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध, तर पाकिस्तानचा सामना श्रीलंकेविरुद्ध झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरीकडे, पाकिस्तानने श्रीलंकेचा 31 धावांनी पराभव करून स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात केली. या संदर्भात, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पाकिस्तानला हलक्यात घेऊ नये. स्पर्धेतील पुढील वाटचाल भारतीय संघासाठी अवघड बनली असून आता पुढील सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.





