Women’s T20 World Cup 2024 (IND vs PAK) : अरुंधतीला आक्रमता पडली महागात, आयसीसीनं केली मोठी कारवाई…

Women’s T20 World Cup 2024 (IND vs PAK) :- महिला टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेत रविवारी झालेल्या सातव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. यासामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 106 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने 18.5 षटकांत 4 गडी गमावून सामना जिंकला. अरुंधती रेड्डीने पाकिस्तानविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी केली, पण उत्साहात भारतीय वेगवान गोलंदाजाचे भान हरपले. अरुंधतीने सामन्याच्या मध्यावर एक मोठी चूक केली, ज्यासाठी आयसीसीने तिला फटकारले आहे.
Arundhati Reddy has been reprimanded for giving a fiery send-off to Nida Dar. pic.twitter.com/CKgxqmPlVY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 7, 2024
वास्तविक ,भारताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डीला महिला टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानच्या निदा दार हिला बाद झाल्यानंतर आक्रमक हावभाव दाखविण्यासाठी आयसीसीच्या वतीने फटाकारण्यात आले आहे. निदा दार ही 20 व्या षटकांत बाद झाली होती, त्यावेळी अरुंधतीने तिला आक्रमक हावभाव दाखविले होते. त्याची नोंद मैदानावरील पंच एलॉइस शेरीडन व लॉरेन एजेनबैग यांच्यासह तिसरे पंच जॅकलीन विल्यम्स व चौथे पंच क्लेअर पोलोसाक यांनी घेतली होती.
त्यानुसार आयसीसीने अरुंधतीला फटकारले आहे. अरुंधतीला आयसीसी आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.5 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. भारतीय गोलंदाजाची ही कृती आयसीसीला आवडली नाही आणि त्यांनी अरुंधतीला एक डिमेरिट पॉइंट दिला आहे. दरम्यान, रेड्डी हिने आपली चूक मान्य केली असून त्यांनी केलेल्या कृतीबद्दल माफीही मागितली आहे. जर एखाद्या खेळाडूला चार डिमेरिट गुण मिळाले तर त्याला एका सामन्याच्या बंदीला सामोरे जावे लागते.
दरम्यान, अरुंधती रेड्डीने पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये, भारतीय वेगवान गोलंदाजाने केवळ 19 धावा दिल्या आणि तीन मोठ्या विकेट घेतल्या. निदासोबतच अरुंधतीने ओमिमा सोहेल आणि आलिया रियाझलाही बाद केले. अरुंधतीचा हा स्पेल तिच्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोत्तम स्पेल होता. तिला या कामगिरीसाठी ‘प्लेअर आॅफ द मॅच’ पुरस्कारही देण्यात आला.





