Women’s T20 World Cup 2024 (Final) : द. आफ्रिकेचा न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजीचा निर्णय, विजेतेपदाच्या लढतीसाठी ‘अशी’ आहे दोन्ही संघाची Playing XI…

Women’s T20 World Cup 2024 (NZ W vs SA W ,Final) : महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यामुळे आज महिला T20 फॉरमॅटमध्ये जगाला एक नवा चॅम्पियन मिळणार आहे. या दोन्ही संघांनी या फॉरमॅटमध्ये कधीही विश्वचषक जिंकलेला नाही. न्यूझीलंडच्या महिला संघाने 2000 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर दक्षिणेला अद्याप आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही. अशा परिस्थितीत दोन्ही संघांना इतिहास रचण्याची संधी आहे.
दोन्ही संघ आपापल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात आहेत. अशआ या विजेतपदाच्या लढतीत द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ कोणतेही बदल न करता जेतेपदाच्या लढतीत मैदानात उतरले आहेत.
TOSS 🪙
The Proteas Women have won the toss and elected to bowl in the ICC Women’s #T20WorldCup 2024 Final against New Zealand.
SA Playing XI ⬇️🇿🇦#WozaNawe #BePartOfIt #WhateverItTakes pic.twitter.com/mnuLpwOMRU
— Proteas Women (@ProteasWomenCSA) October 20, 2024
दोन्ही संघाची Playing XI खालीलप्रमाणे…
न्यूझीलंड : सूजी बेट्स, जॉर्जिया प्लाइमर, अमेलिया केर, सोफी डिवाइन (कर्णधार), ब्रूक हॉलिडे, मैडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टीरक्षक), रोजमेरी मेयर, ली ताहुहु, ईडन कार्सन, फ्रैन जोनास.
दक्षिण अफ्रीका : लौरा वोल्वार्ड्ट (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, एनेके बॉश, क्लो ट्रायॉन, मारिजेन कप, सुने लुस, नादिन डी क्लार्क, एनेरी डार्कसेन, सिनेलो जाफ्ता (यष्टीरक्षक), नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका.
दरम्यान, न्यूझीलंडने उपांत्य फेरीत वेस्ट इंडिज संघाचे आव्हान मोडून काढताना तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला तर स्पर्धेच्या अन्य उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत केले. दक्षिण आफ्रिका संघाला 2023 च्या स्पर्धेत अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. त्यावेळी केवळ 19 धावांनी त्यांना विश्वकरंडक स्पर्धेवर मोहोर लावता आली नवहती. त्यामुळे यावेळी न्यूझीलंड सारख्या चांगल्या संघाला पराभूत करून विजेतेपद मिळविण्यासाठी ते चांगले झुंजतील.





