मुंबई – बीसीसीआयने यंदापासून सुरू केलेली महिलांची आयपीएल स्पर्धा लवकरच जगातील महिलांच्या जीतक्या टी-20 लीग होतात त्यात सर्वात श्रीमंत लीग बनणार आहे. त्यासाठी महिला लीगसाठी बीसीसीआयने तब्बल 10 नव्या कंपन्यांशी मोठ्या रकमेचे करार केले आहेत.
या महिन्यात 4 तारखेला सुरु झालेल्या या लीगचा अंतिम सामना येत्या 26 मार्चला होणार आहे. या लीगमुळे महिला क्रिकेटला कार्पोरेट प्रतिष्ठाही मिळत असून या पहिल्याच मौसमात 5 संघ 300 ते 400 कोटी रुपयांना विकत घेतले गेले.
पाच संघांची विक्री झाल्यावर हीच रक्कम एकूण 4 हजार 669 कोटी इतकी वाढली. त्यातच या लीगचे प्रक्षेपण हक्क तब्बल 951 कोटींना विकले गेले. या लीगसाठी 10 कंपन्यांशी प्रायोजकत्व करार झाले असून प्रत्येक संघाला यातून किमान 20 कोटी रुपये अतिरीक्त मिळणार आहेत.
बीसीसीआयच्या पहिल्या मौसमाच्या अनुभवावरून येत्या 10 वर्षांत तोटा भरून निघेल व ही लीग जगातील सर्वात श्रीमंत महिला टी-20 लीग म्हणून ओळखली जाईल. 2008 साली सुरू झालेल्या पुरुषांच्या आयपीएलला इतकी लोकप्रीयता मिळवण्यासाठीही इतकाच काळ लागला होता.