Women’s Hockey India League 2024-25 Auction : उदिता ठरली सर्वात महागडी खेळाडू, भारतीय कर्णधारापेक्षा ज्युनियर खेळाडूंवर पडला पैशांचा जास्त पाऊस…

Women’s Hockey India League 2024-25 auction : पहिल्यांदाच आयोजित करण्यात येत असलेल्या महिला हॉकी इंडिया लीगचा लिलाव बुधवारी दिल्लीत पार पडला. लिलावात भारतीय खेळाडूंसाठी संघांनी भरपूर पैसा खर्च केला. भारतीय कर्णधार सलीमा टेटे, युवा खेळाडू उदिता दुहान, लारेमसियामी हमरजोटे आणि माजी कर्णधार सविता पुनिया ही नावे महागात पडली. मात्र, कर्णधार सलीमा टेटेपेक्षा ज्युनियर खेळाडूंवर जास्त पैशांचा पाऊस पडला.
उदिता दुहान ठरली सर्वात महागडी खेळाडू..
हॉकी इंडिया लीग 2024-25 महिला लिलावाच्या पहिल्या टप्यात सर्व चार फ्रँचायझींनी मंगळवारी 41 भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी बोली लावली. हॉकी इंडिया महिला लीगच्या पहिल्या टप्प्यासाठी भारतीय बचावपटू उदिता दुहान ( Udita Duhan) ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. जिच्यासाठी अनेक संघांमध्ये लढत होती. सरतेशेवटी, सुरमा आणि बंगालमध्ये दीर्घ बोलीचे युद्ध झाले आणि उदिताला लिलावात श्राची रार बंगाल टायगर्सने 32 लाख रुपयांना खरेदी केले. मात्र, पुरुष लीगमधील सर्वात महागड्या खेळाडूच्या तुलनेत ही रक्कम निम्म्याहून कमी आहे. याशिवाय नेदरलँडची ड्रॅग फ्लिकर यब्बी जॅनसेन हिला ओडिशा वॉरियर्सने 29 लाख रुपयांना खरेदी केले गेले.
Udita joins Bengal Tigers for a record-breaking 32L! 🏑💥 Get ready for some jaw-dropping performances as she takes the field!#HILisback #HILPlayerAuction #HILWomensPlayerAuction pic.twitter.com/Qb8mAS9EZg
— Hockey India League (@HockeyIndiaLeag) October 15, 2024
इशिका चौधरीने रचला इतिहास
सर्व संघांकडे 2 कोटी रुपये होते, त्यापैकी त्यांना 24 खेळाडू खरेदी करायचे होते. दिवसाची सुरुवात ज्योतीने केली पण ती 10 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह अनसोल्ड राहिली . तर प्रीती दुबे हिलाही खरेदीदार मिळाला नाही. डिफेंडर इशिका चौधरी ही लिलावात विकली जाणारी पहिली खेळाडू ठरली. तिच्यासाठी ओडिशा पुढे आले. ओडिशा वॉरियर्सने या खेळाडूला 16 लाख रुपयांना खरेदी केले.
सलीमा टेटे पंजाबच्या ताफ्यात….
भारतीय संघाची कर्णधार सलीमा टेटे हिला सुरमा हॉकी क्लबने 20 लाखांमध्ये करारबद्ध केले. पुरुष संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगनंतर महिला संघाची कर्णधारही पंजाबसंघामध्ये दिसणार आहे . टीम इंडियाची माजी कर्णधार सविता पुनियाही पंजाबकडून खेळताना दिसणार आहे. माजी कर्णधार राणी रामपालने तिच्यासाठी बोली लावली आणि सविताला 20 लाख रुपयांमध्ये संघात सामील करून घेतले.
युवा भारतीय खेळाडू लालरेमसियामीला श्राची राढ बंगाल टायगर्सने 25 लाख रुपयांना विकत घेतले. सुनीता टोप्पोला दिल्ली एसजी पाइपर्सने 24 लाख रुपयांना आणि संगीता कुमारीला दिल्ली एसजी पाइपर्सने 22 लाख रुपयांना खरेदी केले. या काळात अनेक परदेशी खेळाडूंवर देखील बोली लावली गेली. ज्यामध्ये बेल्जियमची शार्लोट एंजेलबर्ट (सूरमा हॉकी क्लब, रु. 16 लाख), जर्मनीची शार्लोट स्टेपनहॉर्स्ट (सुरमा हॉकी क्लब, रु. 16 लाख) आणि ऑस्ट्रेलियाची जेसलीन बार्ट्राम (ओडिशा वॉरियर्स, रु. 15 लाख) यांना चांगल्या किमतीत खरेदी करण्यात आले. अनुभवी स्ट्रायकर वंदना कटारियाला बंगाल टायगर्सने 10.5 लाखांना विकत घेतले गेले.
भारतीय कर्णधार सलीमा टेटे (20 लाख), इशिका चौधरी (16 लाख) आणि नेहा गोयल (10 लाख) यांना ओडिशा वॉरियर्सने विकत घेतले. माजी कर्णधार सविता (20 लाख), शर्मिला देवी (10 लाख) आणि निक्की प्रधान (12 लाख) यांना सुरमा हॉकी क्लबने विकत घेतले. दिल्ली एसजी पाइपर्सने आंतरराष्ट्रीय खेळाडू नवनीत कौर (19 लाख), युवा गोलरक्षक बिचू देवी खरीबम (16 लाख) आणि दीपिका (20 लाख) यांना खरेदी केले.

