Women’s Day 2025 । Madhuri Dixit : ९० च्या दशकातील सुपरस्टार ‘माधुरी दीक्षित’ला आजही असे वाटते की, चित्रपटांमध्ये सर्वाधिक मानधन घेताना आजही त्यांची स्पर्धा पुरुष कलाकारांबरोबर असते. तुम्ही कितीही मोठे सुपरस्टार असलात तरीही सिनेमाचे मानधन घेताना लिंग-आधारित डावे-उजवे होत असते. यालाच सामान्यपणे पे पॅरिटी असे म्हणतात. अजूनही महिलांसाठी पे पॅरिटी एक दूरचे स्वप्न आहे. त्यामुळेच सिनेमातले करिअर वाटते तितके सोपे नाही. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित आयफा वीकेंडमध्ये माधुरी दीक्षित यांनी द जर्नी ऑफ वुमन इन सिनेमा या चर्चासत्रात भाग घेतला. त्यावेळी चमकत्या सिनेसृष्टीची काळी बाजू दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तेजाब, हम आपके हैं कौन..!, दिल तो पागल है, खलनायक आणि देवदाससारख्या चित्रपटांची स्टार असलेल्या माधुरीने हेच सांगितले की, ‘सिनेसृष्टीमध्ये आजही भेदभाव मोठ्या प्रमाणावर केला जातो. महिलांना स्वतःला वारंवार सिद्ध करावे लागते आणि एकीकडे आपण समान आहोत, असे सांगत असतानाच तुम्ही आर्थिकदृष्ट्या पटकन सबल नाही बनू शकत. सिनेमाचे मानधन घेताना आपल्या पाकिटात नेहमीपेक्षा जास्त नोटा याव्यात, यासाठी सतत संघर्षरत रहावे लागते. माधुरी पुढे म्हणाल्या की, हिंदी सिनेमात महिलांना योग्य मानधन मिळते की नाही, हा प्रश्नच गैरलागू आहे. तिथे मानधन कमी मिळतेच, पण आपल्या कारकिर्दीत साकार केलेल्या प्रत्येक चित्रपटात तिने सक्षम महिलांचेच प्रतिनिधित्त्व केले. मृत्युदंड हा मला विशेष आवडणारा चित्रपट होता, कारण त्यात तिची भूमिका सर्वाधिक सशक्त होती. बेटा, दिल, राजा, दिल तो पागल है अशा चित्रपटांतील भूमिकांमधून मी घडली आहे. पण मृत्युदंड सिनेमाने पुरुष-सत्ताक भूमिकेचा पर्दाफाश केला. त्याने मी खूपच प्रभावित झाले. माधुरी दीक्षित असेही म्हणाली की, तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सेटवर फक्त अभिनेत्री आणि केशभूषाकार एवढ्याच महिला होत्या. शिवाय खूप कमी महिला दिग्दर्शक होत्या. त्यावेळी माधुरी फक्त सई परांजपे यांना ओळखत होती. पण आता जेव्हा मी (अमेरिकेहून) परत आले आणि सेटवर गेले, तेव्हा प्रत्येक विभागात महिला होत्या – जाहिरातदार, डीओपी, लेखक आणि पूर्वीपेक्षा जास्त दिग्दर्शक. महिला सर्वत्र आहेत, जे पाहणे मला खूप आनंददायी वाटते आणि हा एक मोठा बदल आहे.