Womens Asia Cup 2024 : टीम इंडिया श्रीलंकेत दाखल..! पाकिस्तानशी होणार पहिला सामना; येथे पहा संपूर्ण वेळापत्रक…

Womens Asia Cup 2024 (Team India) : महिला टी-20 आशिया कप 2024 श्रीलंकेच्या भूमीवर होणार आहे आणि या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय महिला संघ मंगळवारी श्रीलंकेत पोहोचला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळी आशिया कप श्रीलंकेत खेळवला जात आहे. टीम इंडिया 19 जुलै रोजी आशिया कप 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 19 जुलैला पाकिस्तानशी होणार आहे.
Welcome to Sri Lanka, Team India and Team Bangladesh! 🛬
The stage is set, the teams are ready, and the action is about to begin in Dambulla on July 19th.#WomensAsiaCup #AsiaCup #SriLankaCricket pic.twitter.com/8DoVrfDn4g
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 16, 2024
आशिया चषकासाठी भारतीय महिला संघाची घोषणा आधीच करण्यात आली होती. संघाची कमान हरमनप्रीत कौरच्या हाती आहे. स्मृती मानधना हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये भारत आणि बांगलादेशचे खेळाडू दिसत आहेत. फोटोंमध्ये कॅप्टन हरमनप्रीत कौर, श्रेयंका पाटील आणि जेमिमाह रॉड्रिग्ज विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत.
आशिया कप 2024 मध्ये टीम इंडियाचे वेळापत्रक..
भारत विरुद्ध पाकिस्तान (19 जुलै, रात्री 7 वा.)
भारत वि युएई (21 जुलै, दुपारी 2 वा.)
भारत विरुद्ध नेपाळ (23 जुलै,रात्री 7 वा.)
टीम इंडियाचा ‘अ’ गटात समावेश….
महिला आशिया कपच्या नवव्या आवृत्तीत सर्व 8 संघांची 4-4 च्या दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला अ गटात ठेवण्यात आले आहे. अ गटात टीम इंडियासोबत पाकिस्तान, नेपाळ आणि यूएईच्या संघांना स्थान देण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेश, थायलंड, श्रीलंका आणि मलेशिया या संघांना ब गटात ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कप 2024 चे उपांत्य फेरीचे सामने 26 जुले तर अंतिम सामना 28 जुलै रोजी होणार आहे.
टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने स्पर्धा महत्त्वाची
भारत गतविजेता असून सात वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. बांगलादेशमध्ये ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने ही स्पर्धा महत्त्वाची आहे. कारण यातून भारतीय संघाच्या तयारीचे महत्त्वाचे आकलन होणार आहे.





