Women’s Asia Cup 2024 : ऋचा-हरमनप्रीतची स्फोटक फलंदाजी, भारतानं यूएईसमोर विजयासाठी ठेवलं विशाल लक्ष्य….

Women’s Asia Cup 2024 (IND vs UAE) : श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला आशिया चषक 2024 मध्ये आज भारताचा सामना युएई (UAE) विरुद्ध सुरू आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास इंडिया थेट सेमीफायनलमध्ये पोहोचेल. या सामन्यात यूएईची कर्णधार ईशा रोहित ओझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात तनुजा कंवर हिने भारताकडून पदार्पण केले. श्रेयंका पाटील दुखापतीमुळे आधीच प्लेईंग-11 मधून बाहेर आहे. तिच्या जागी तनुजाचा संघात समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, यासामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली आहे . भारतीय महिला संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 201 धावा केल्या आहेत. त्यामुळे युएईला विजयासाठी 202 धावांचे विशाल लक्ष्य मिळाले आहे.
Innings Break!
Fifties from Captain @ImHarmanpreet & @13richaghosh power #TeamIndia to 201/5 in 20 overs
Over to our bowlers 💪
Scorecard ▶️ https://t.co/fnyeHavziq#WomensAsiaCup2024 | #ACC | #INDvUAE pic.twitter.com/mRVUMxa91j
— BCCI Women (@BCCIWomen) July 21, 2024
या सामन्यात शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 23 धावांची भागीदारी झाली. कविशाने उपकर्णधार मंधानाला रिनीता राजीथच्या हातून झेलबाद केले. गेल्या सामन्यात 45 धावांची स्फोटक खेळी खेळणाऱ्या या स्टार फलंदाजाला केवळ 13 धावा करता आल्या. मात्र शफालीने 37 धावांची शानदार खेळी केली. 18 चेंडूंचा सामना करताना तिने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या दयालन हेमलताला केवळ दोन धावा करता आल्या.
यानंतर हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी पदभार स्वीकारला. चौथ्या विकेटसाठी दोघींमध्ये 54 धावांची भागीदारी झाली जी 12व्या षटकात कविशाने मोडली. जेमिमा 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्याचवेळी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋचा घोषने दमदार कामगिरी करत कर्णधारासोबत 75 धावांची भागीदारी केली. 19.1 षटकात संघाची धावसंख्या 181 असताना हरमनप्रीत कौर 47 चेंडूत 66 धावांची स्फोटक खेळी करून बाद झाली. तिने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान तिने सात चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी यष्टीरक्षक फलंदाज घोष हिनं 29 चेंडूंचा सामना करत 64 धावांची तुफानी खेळी खेळली. यादरम्यान तिने 12 चौकार आणि एक षटकार लगावला. पूजा वस्त्राकर आणि ऋचा यांच्यात 20 धावांची नाबाद भागीदारी झाली. विशेष म्हणजे पूजा वस्त्राकर नाबाद राहिली, तिला खातेही उघडता आले नाही.
Women’s Asia Cup 2024 : टीम इंडियाची धमाकेदार सुरुवात, पाकिस्तानचा 7 गडी राखून केला पराभव…
यूएईकडून कविशाने 2 बळी घेतले. तिने 4 षटकात 36 धावा दिल्या. हीनाने 4 षटकात 40 धावा देत 1 बळी घेतला. समायराने 4 षटकात 42 धावा देत 1 बळी घेतला. याशिवाय कोणालाही विकेट मिळाली नाही. कर्णधार ईशाने 2 षटकात 26 धावा दिल्या.





