Paris Olympics 2024 (4x400m Relay) : भारतीय महिला रिले संघाची निराशाजनक कामगिरी…

Paris Olympics 2024 (Athletics,Women’s 4x400m Relay Round 1) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चे शेवटचे दोन दिवस उरले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज (शुक्रवार,9 ऑगस्ट) भारताचा 14 वा दिवस आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण पाच पदके जमा झाली आहेत. त्यात भारताने नेमबाजीमध्ये तीन पदके, हॉकीमध्ये एक कांस्य पदक आणि ॲथलेटिक्समध्ये एक रौप्य पदक जिंकले आहे.
आज झालेल्या महिलांच्या 4×400 मीटर रिले स्पर्धेतून निराशाजनक बातमी आली आहे. भारतीय महिलांचा 4×400 मीटर रिले संघ देखील पहिल्या फेरीतील हीटमध्ये 16 सहभागी राष्ट्रांमध्ये 15व्या स्थानावर राहून अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही. भारतीय संघाच्या विथ्या रामराज, ज्योतिका श्री दांडी, एमआर पूवम्मा आणि शुभा वेंकटेशन यांच्या चौकडीने 3:32.51 अशी वेळ नोंदवली आणि पहिल्या फेरीत एकूण 15वे स्थान तर हीट दोनमध्ये आठवे म्हणजेच शेवटचे स्थान मिळवले.
Women’s 4 x 400 M Relay Round 1 – Heat 2👇🏻
The team of Jyothika Sri Dandi, Poovamma Raju Machettira, Vithya Ramraj, and Subha Venkatesan give it their all but are unable to qualify for the final. They finished 8th in Heat 2, clocking 3:32.51.
Well tried, girls! 👏🏻
Keep… pic.twitter.com/HFxLrQTM9d
— SAI Media (@Media_SAI) August 9, 2024
दरम्यान,पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताची स्टार नेमबाज मनू भाकरने पदकाचे खाते उघडले. तर दुसरे पदक मनूनेच सरबजोत सिंगच्या साथीने जिंकले. याशिवाय पुरुषांच्या थ्री पोझिशन्स रायफल स्पर्धेत स्वप्नील कुसाळेने तिसरे स्थान मिळवून कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे. गुरूवारी तेराव्या दिवशी भारताच्या हॉकी संघाने कांस्य पदक तर गोल्डन बॉय नीरज चोप्राने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे.





