महिलेने अभिनेत्याचे पायच धरले आणि ढसाढसा रडली ! चाहते म्हणतात,ही रामानंद सागर यांच्या रामायणाची जादू

Updated On:

मुंबई – ऐशीच्या दशकातील प्रसिद्ध मालिका ‘रामायण’ आजही लोकांमध्ये पूर्वीइतकीच लोकप्रिय आहे.रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ मालिकेतील सर्व पात्रे कायमची अजरामर झाली आहेत. या मालिकेत रामाच्या भूमिकेत दिसणारा अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेत दिसलेली दीपिका चिखलिया लोकांमध्ये इतकी लोकप्रिय झाली की आजही प्रेक्षकांनी त्यांना पाहिले की त्यांना खऱ्या रामायणाचीच आठवण येते. त्याबाबतचाच एक किस्सा सध्या समोर आला आहे.

अभिनेता अरुण नुकताच संभाजीनगरला पोहोचला होता. यादरम्यान, अभिनेत्याला विमानतळावर पाहून एक महिला भावूक झाली आणि तिने त्याच्या पाया पडून त्याला नमस्कार केला. या व्हिडीओतील महिलेला पाहून जणू तिला भगवान रामच मिळाले आहेत असं वाटत आहे. एवढेच नाही तर अभिनेत्याला पाहताच महिलेच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये अभिनेता महिलेला उठण्याची विनंती करताना दिसला. यानंतर त्यांनी एकत्र फोटोसाठी पोजही दिली.

अरुण गोविलला पाहून लोकांच्या अशा प्रतिक्रिया येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्यासोबत असे अनेकदा झाले आहे. रामायणापासून लोक त्यांना फक्त राम म्हणून पाहतात. ते जरी अभिनेते असले तरी लोक आजही त्यांच्या प्रभू रामचंद्रच शोधतात. चाहत्यांनी यावर कमेंट करत रामानंद सागर यांच्या रामायणाची ही जादू असल्याचे म्हंटले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-10-04 18:56:41

Top 10 News : विधानपरिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ते ठाकरे बंधूंचा सरकारवर घणाघात..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News

2026-10-03 10:04:18

TOP 15 News: काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर ते कॅप्टन स्मितशी मोदींचा संवाद; संकटात हनुमानाची प्रार्थना, जाणून घ्या TOP 15 News

Kangana Ranaut : कंगना रणौत चांदीच्या ग्लासातूनच पाणी का पिते? जाणून घ्या 'हे' जबरदस्त फायदे

2026-09-28 17:21:14

Kangana Ranaut : कंगना रणौत चांदीच्या ग्लासातूनच पाणी का पिते? जाणून घ्या 'हे' जबरदस्त फायदे

Top 10 News : महिनाभरापासून CSC सेंटर बंद ते पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

2026-09-27 18:01:58

Top 10 News : महिनाभरापासून CSC सेंटर बंद ते पुढील वर्षीच्या पावसावरही एल निनोचं सावट..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या