Pune District : बारामतीत २१ जागांवर महिलाराज

बारामती : बारामती नगर परिषदेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या उपस्थित ही सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीनंतर अनेकांचे राजकीय अस्तित्वपणाला लागले आहे.
प्रभागात आरक्षण न मिळाल्याने अनेकांचे नियोजन कोलमडले आहे. सोडतीच्या वेळी सभागृहात इच्छुक असलेल्या उमेदवारांनी गर्दी केली. २० प्रभागातील ४१ जागांपैकी २१ जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्या आहेत. १ ते १९ प्रभागात प्रत्येकी दोन, तर शेवटच्या २० व्या प्रभागात ३ नगरसेवक निवडुन येतील.
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १ अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला. प्रभाग २ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),सर्वसाधारण.प्रभाग ३ नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला. प्रभाग ४ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण. प्रभाग ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला. प्रभाग ६ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण. प्रभाग ७ नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला. प्रभाग ८ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण. प्रभाग ९ नागरिकांचा प्रवर्ग, सर्वसाधारण महिला.
प्रभाग १० नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण. प्रभाग ११ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण.प्रभाग १२ अनुसुचित जाती महिला, सर्वसाधारण.प्रभाग १३ अनुसुुचित जाती (महिला), सर्वसाधारण.प्रभाग १४ अनुसुचित जाती महिला, सर्वसाधारण.प्रभाग १५ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) सर्वसाधारण.प्रभाग १६ अनुसुचित जाती, सर्वसाधारण महिला. प्रभाग १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला. प्रभाग १८ अनुसुचित जाती, सर्वसाधारण महिला. प्रभाग १९ अनुसुचित जाती महिला, सर्वसाधारण. प्रभाग २० अनुसुचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), सर्वसाधारण (महिला).





