महिला दिनानिमित्त शिरूर शहरामधून महिला पोलिसांची बाईक रॅली
Updated On:

शिरूर : जागतिक महिला दिनानिमित्त शिरूर पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी यावेळी पोलीस स्टेशन मधील सर्व महिला पोलिस अंमलदार यांना फेटे बांधून त्यांना पोलीस स्टेशनच्या वतीने साडी भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी सर्व महिला पोलिस अंमलदार यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शिरूर शहरांमधून मोठया दिमाखात बाईक रॅली काढली. त्यामधून जनसामान्य माणसांमध्ये महिला पोलीस अंमलदार यांच्यावतीने महिला सबलीकरनाचा संदेश देण्यात आला. यावेळी शिरूर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





