Women’s Day: महिला दिनानिमित्त सूर्यदत्ततर्फे विनामूल्य कर्करोग तपासणी शिबिर
Women's Day: विनामूल्य नोंदणीसाठी आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक ७२६२ ०११३३८ किंवा ७२६२ ०११७७४ या व्हाट्सअप क्रमांकांवर पाठवावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांनी केले आहे.

Women’s Day: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सतर्फे शनिवारी (दि. ७ मार्च) पुरुष व महिलांसाठी विनामूल्य कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये हे शिबिर सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे.
या आजारांची तपासणी होणार?
राहुरी येथील साईधाम कॅन्सर चॅरिटेबल हॉस्पिटल आणि डॉ. माने मेडिकल फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. साईधाम मॉडेल ऑफ कॅन्सर केअरचे प्रवर्तक डॉ. स्वप्नील माने यांच्या मार्गदर्शनाखाली ‘साई संजीवनी क्लिनिक ऑन व्हील्स’च्या माध्यमातून तोंडाचा कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय विकार यांची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या फिजिओथेरपी विभागाचे तज्ज्ञ स्नायू व हाडांचे आरोग्य, पुनर्वसनाची गरज आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना यांबाबत सविस्तर तपासणी करणार आहेत.
कर्करोगाची लक्षणे लवकर ओळखणे आणि वेळेत उपचार सुरू करता यावेत, यासाठी जनजागृती करणे हे या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्वांना मोफत तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार आहे, असे संस्थेचे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सांगितले.
अशी करा नोंदणी –
विनामूल्य नोंदणीसाठी आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक ७२६२ ०११३३८ किंवा ७२६२ ०११७७४ या व्हाट्सअप क्रमांकांवर पाठवावा, असे आवाहन प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर यांनी केले आहे. हे शिबिर सूर्यदत्त एज्यु-सोशियो हेल्थ इनिशिएटिव्ह अंतर्गत आयोजित करण्यात आले असून अधिकाधिक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.





