पिंपरी, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना व हेमंत डांगे यूथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चिंचवडमधील घरगुती गौरी, गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा निगडी प्राधिकरण येथील ग. दि माडगुळकर सभागृहात पार पडला. यावेळी नवरात्रीनिमित्त दहा महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे यांनी दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका अश्विनी चिखले, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अनिकेत प्रभु, महिला सेनेच्या शहराध्यक्षा अनिता पांचाळ, विधी विभाग अध्यक्षा ॲड. प्रीती सिंह परदेशी, महिला सेनेच्या चिंचवड विभाग अध्यक्षा वैशाली बोत्रे, राजेश अवसरे आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. याप्रसंगी ओंकार पाटोळे, अक्षय नाळे, शरण्य पाटणे, तुषार वराडे, आकाश पांचाळ, निखिल गावडे, प्रज्योत पुजारी, किरण पाटील, महेश बडगुजर, प्रसाद दुधुसकर, रुद्र बैरागी, ऋषिकेश भोसले, ओकांर पार्टे, ओंकार खलाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. हेमंत डांगे यांनी सहभागी स्पर्धकांचे आभार मानले. असे आहेत स्पर्धेतील बक्षिसे गौरी सजावट स्पर्धाः प्रथम क्रमांकास – ओव्हन, द्वितीय – फूड प्रोसेसर, तृतीय – होम थिएटर, गणपती सजावट स्पर्धाः प्रथम क्रमांकास – मिक्सर, द्वितीय – टोस्टर, तृतीय – सॅडविच ग्रिलर तसेच सहा उत्तेजनार्थ स्पर्धकांना इलेक्ट्रिक किटली व इस्री देण्यात आले. त्याचप्रमाणे कार्यक्रमस्थळी तीन लकी ड्रॉ काढण्यात आले. त्यामध्ये लेडीज घड्याळ, हेअर ड्रायर, हेअर स्टेटनर या वस्तू देण्यात आल्या.