पुणे – मित्रासोबत सिनेमा पाहण्यास जाणे विवाहितेला महागात पडले आहे. महिलेच्या पतीने सिनेमागृह आवारातच त्या महिलेस चोप दिला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
संबंधित महिला रविवारी दुपारी आयनॉक्स सिनेमागृहात मित्रासोबत गेली होती. तेवढ्यात तिचा पती तेथे आला व त्याने मारहाण सुरू केली. तेथील कर्मचाऱ्यांनी महिला, तिचा पती आणि मित्रास पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस ठाण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वांच्या कुटुंबीयांना बोलावून घेत समजूत घातली आहे.