India Tour of England 2025 : भारतीय महिला संघही जाणार इंग्लंड दौऱ्यावर, BCCIने जाहीर केलं ODI-T20 मालिकेचे वेळापत्रक…

India Tour of England 2025 : भारतीय महिला आणि पुरुष संघ पुढील वर्षी म्हणजेच जून 2025 ला इंग्लंडचा दौरा करतील. यादरम्यान पुरुष संघ 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. तर महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.
भारतीय महिला संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत-इंग्लंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. 28 जून ते 22 जुलै 2025 यादरम्यान भारतीय महिला संघ आणि इंग्लंड यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
यासाठी भारतीय महिला संघ जून 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या कालावधीत पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना 28 जून रोजी नॉटिंगहॅम येथे होणार आहे. दुसरा सामना 1 जुलै रोजी ब्रिस्टल येथे होणार आहे. तिसरा सामना 4 जुलै रोजी लंडनमध्ये होणार आहे. मालिकेतील चौथा सामना 9 जुलै रोजी मँचेस्टर येथे होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 12 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे होणार आहे.
टी-20 मालिकेचे वेळापत्रक…
पहिला टी20 सामना : 28 जून, ट्रेंट ब्रिज
दुसरा टी20 सामना : 1 जुलै, ब्रिस्टल
तिसरा टी20 सामना : 4 जुलै, ओव्हल
चौथा टी20 सामना : 9 जुलै, ओल्ड ट्रॅफर्ड
पाचवा टी20 सामना : 12 जुलै, एजबॅस्टन
टी-20 मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 16 जुलै रोजी साउथॅम्प्टन येथे होणार आहे. दुसरा सामना 19 जुलै रोजी लंडनमध्ये होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 22 जुलै रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे होणार आहे.
𝗔𝗹𝗹 𝗦𝗲𝘁!👍 👍#TeamIndia‘s schedule for the 5⃣ T20Is and 3⃣ ODIs against England in 2025 ANNOUNCED 🗓️#ENGvIND pic.twitter.com/fb0tScY8cq
— BCCI Women (@BCCIWomen) August 22, 2024
एकदिवसीय (वनडे) मालिकेचे वेळापत्रक…
पहिला वनडे सामना : 16 जुलै, साउथॅम्प्टन
दुसरा वनडे सामना – 19 जुलै, लॉर्ड्स
तिसरा वनडे सामना – 22 जुलै, चेस्टर-ले-स्ट्रीट
दरम्यान, महिला टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या तयारीत आहे. महिला टी-20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती. मात्र बांगलादेशातील अस्थिर वातावरणामुळे त्याचे यजमानपद हिरावून घेण्यात आले आहे. आता ही स्पर्धा यूएईमध्ये होऊ शकते. यामध्ये भारताचा पहिला सामना न्यूझीलंडशी तर दुसरा सामना पाकिस्तानशी होणार आहे. टीम इंडियाचा शेवटचा गट सामना 9 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.





