IND vs ENG Test Series 2025 : टीम इंडिया पुढील वर्षी जूनमध्ये जाणार इंग्लंड दौऱ्यावर, BCCIने जाहीर केलं वेळापत्रक…

India vs England Test Series Schedule : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडिया जून 2025 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान, कसोटी मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून लीड्समध्ये खेळवला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या मालिकेतही रोहित शर्माच कर्णधार असू शकतो. बीसीसीआयने वेळापत्रकासह रोहितचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे पुढील वर्षीही रोहित संघाचे कर्णधारपद संभाळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
टीम इंडिया पुढील वर्षी जवळपास दीड महिना इंग्लंडमध्ये असेल. या कालावधीत मालिकेतील पहिला सामना 20 जून ते 24 जून दरम्यान खेळवला जाईल. हा सामना लीड्स येथे होणार आहे. कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. हा सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. तिसरा सामना 10 जुलै ते 14 जुलै दरम्यान लंडनमधील लॉर्ड्सवर खेळवला जाईल. चौथा सामना 23 जुलैपासून होणार आहे. हा सामना मँचेस्टर येथे होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनमधील ओव्हल मैदानावर होणार आहे.
रोहितच असणार कर्णधार…?
BCCI ने ट्विटरवर (एक्स) भारत-इंग्लंडचे वेळापत्रक शेअर केले आहे. शेड्यूलसोबत रोहित शर्माचा फोटोही शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील वर्षीही रोहितच या दौऱ्यावर टीम इंडियाचा कर्णधार असेल. त्याच्यासोबत विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल देखील संघाचा भाग बनू शकतात. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत तंदुरुस्त राहिल्यास त्याचे स्थान जवळपास निश्चित होईल. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहलाही संधी मिळू शकते.
Announced! 🥁
A look at #TeamIndia‘s fixtures for the 5⃣-match Test series against England in 2025 🙌#ENGvIND pic.twitter.com/wS9ZCVbKAt
— BCCI (@BCCI) August 22, 2024
यंदाच्या वर्षी भारताला खेळायचे आहेत अनेक सामने…
टीम इंडियाला यावर्षीही अनेक सामने खेळायचे आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. बांगलादेशपाठोपाठ भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचं वेळापत्रक
पहिली कसोटी : (20-24 जून, हेडिंग्ले)
दूसरी कसोटी : (2-6 जुलै, बर्मिंघम)
तिसरी कसोटी : (10-14 जुलै, लॉर्ड्स)
चौथी कसोटी : (23-27 जुलै, मॅनचेस्टर)
पाचवी कसोटी : (31 जुलै-4 ऑगस्ट, लंडन)





