‘छावा’ चित्रपट महिलांना मोफत पाहता येणार; आमदार संग्राम जगतापांचा अनोखा उपक्रम

Chhaava Movie | अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. देशभरात या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील विकीने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे. अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. याचदरम्यान अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या सिनेमासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी अहिल्यानगर येथील महिलांसाठी छावा सिनेमाच्या मोफत शोचं आयोजन केलं आहे. काल या शोचा शुभारंभ देखील करण्यात आला असून याबाबत संग्राम जगताप यांनी ट्वीट करत लिहिले की, “महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून “छावा” चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे. १७ फेब्रुवारीपासून या उपक्रमाचा शुभारंभ Cinelife Miniplex येथे करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व महिला भगिनी आपल्या हिंदुधर्माच्या शूरतेचे प्रतीक भगवे फेटे घालून उपस्थित होत्या.”
!! धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय..!🚩
महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून “छावा” चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे.
आज या उपक्रमाचा शुभारंभ Cinelife Miniplex येथे करण्यात आला.… pic.twitter.com/g7dthKihbH— MLA Sangram Jagtap (@sangrambhaiya) February 17, 2025
पुढे त्यांनी लिहिले की, “छावा हा धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य व जीवन गाथेवर आधारित असलेला चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो. परंतु छावा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी एक प्रेरणा संदेश असून छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी कसे जगले व धर्मासाठी कसे त्यांनी बलिदान दिले हा इतिहास या चित्रपटात आहे. त्यांनी यातना सहन केल्या पण धर्मांतरण स्वीकारले नाही. त्यांनी हिंदुत्वासाठी सहन केलेल्या हाल अपेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात या हेतूने हा चित्रपट माता-भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात आला आहे. आपल्या मुलांवरही असेच शौर्याचे संस्कार व्हावेत या हेतूने हा उपक्रम काही हिंदू प्रेमी उद्योजकांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. त्या सर्वांचेच मी आभार मानतो.” Chhaava Movie |
View this post on Instagram
‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, या सिनेमाने अवघ्या तीन दिवसांत १२१ कोटींचा गल्ला जमावला आहे. या सिनेमात विकी-रश्मिकासह अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, संतोष जुवेकर, नीलकांती पाटेकर या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तर सिनेमाचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.Chhaava Movie |
हेही वाचा:
वीटभट्टी चालकाच्या मुलाची दैदिप्यमान भरारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायकपदी निवड





