‘आया रे तुफान…’, ‘छावा’तील गाण्याने दणाणून गेले टाइम्स स्क्वेअर, ‘हा’ जबरदस्त डान्स एकदा बघाच

Chhaava Movie | अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवीन विक्रम करत आहे. चित्रपट रिलीज होऊन जवळपास 3 आठवडे झाले असले तरीही सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होत आहे. या सिनेमाने आतापर्यंत जगभरात 500 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या कमाईचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात विकीने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
या चित्रपटाची लोकप्रियता केवळ महाराष्ट्र आणि देशातच नाही तर जगभरात पाहायला मिळत आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित टाइम्स स्क्वेअर देखील चित्रपटाच्या गाण्यांनी दणाणून गेले आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत असून, यामध्ये काहीजण ‘छावा’ चित्रपटातील ‘आया रे तुफान’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
View this post on Instagram
अमेरिकेतील टाइम्स स्क्वेअर येथे ‘आया रे तुफान’ गाण्यावर प्रसिद्ध डान्सर लॉरेन गॉटलीब आणि रोहित गिजारे यांच्या टीमने डान्स केला. जवळपास 20 कलाकारांनी एकत्र येत एआर रेहमान यांच्या गाण्यावर डान्स केला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हीडिओ पाहायला आहे. याआधी टाइम्स स्क्वेअरवरील ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज करण्यात आला होता.
दरम्यान, छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. याशिवाय सिनेमात अक्षय खन्ना, दिव्या दत्त, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, शुभंकर एकबोटे, आस्ताद काळे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे.





