Boxing | व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सरजुबाला देवी
Updated On:

नवी दिल्ली -भारतीय अनुभवी महिला बॉक्सर आणि ऑलिम्पियन सरजुबाला देवी व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. मणिपूरच्या 28 वर्षीय सरजुबालाने भारतीय बॉक्सिंगचे मुख्य प्रवर्तक मुजतबा कमाल आणि इंफाळमधील ग्रासरूट बॉक्सिंग प्रमोशन यांच्याशी करार केला आहे.
सरजुबाला देवीने कोरिया येथे झालेल्या 2014च्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक आणि युवा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली होती.
दुबई येथे 26 फेब्रुवारी रोजी ती व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणार आहे. सरजुबाला ही चार वेळा राष्ट्रीय चॅम्पियनदेखील आहे. तिने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.





