प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका हॉटेलमध्ये शिरुन हॉटेलमधील अंपग कामगाराला किचनमध्ये जाऊन तू हॉटेल मध्ये बाया पुरवतो का, असे म्हणून मारहाण केली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.स्वाती विलास गायकवाड व अर्चना विशाल केदारी (दोघी रा. ताडीवाला रोड पुणे), संगीता वानखेडे (रा. मोशी, पुणे), महेश खांदवे (रा. लोहगाव, पुणे), असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. महिला सामाजिक कार्यकर्त्या स्वाती विलास गायकवाड, अर्चना विशाल केदारी, संगीता वानखेडे व महेश खांदवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर येथील हॉटेल शारदामध्ये काम करणारा अपंग कामगार गोविंद शिंदे हॉटेलच्या किचनमध्ये असताना काही महिला हॉटेलमध्ये आल्या. त्यांनी गोविंदला तू हॉटेल मध्ये बाया पुरवतो का, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केली. दरम्यान, गोविंद याने मी अपंग आहे मारू नका असे म्हटले तरी देखील सर्वांनी त्याला मारहाण केली. हॉटेल मधील अन्य खोल्यांमध्ये शोधाशोध करायला निघून गेल्या. याबाबत गोविंद नारायण शिंदे (रा. कुंभारवाडा शिक्रापूर) यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली. पुढील तपास हवालदार गणेश करपे हे करीत आहेत.