Pune Crime News : पैश्याच्या वादातून प्रियकराचा खून करणाऱ्या महिलेला जन्मठेप

पुणे : पैशाच्या कारणावरून झालेल्या वादातून प्रियकराचा खून करणाऱ्या महिलेला जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा जिलहा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
सविता प्रकाश जाधव (वय ३०, रा. विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रविण द्नानोबा भाग्यवंत (वय ३०, रा. टाकळे चाळ, विठ्ठलनगर, नेहरूनगर, पिंपरी) याच्या खून प्रकरणी त्याची पत्नी सुनीता (वय २५) हिने पिंपरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
ही घटना ३ सप्टेंबर २०१८ रोजी पिंपरी येथील एका हौसिंग सोसायटीच्या चौथा मजल्यावर ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षतर्फे अतिरिक सरकारी वकील लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. मयत प्रविण आणि सुनीता हिचे प्रेमसंबंध होते. यामुळे प्रविण याने स्वत:च्या घराजवळ सविता हिला घर बांधून दिले होते. तिथे ती पहिल्या पतीपासून झालेल्या दोन मुलासह राहत होती.
दोघात पैशावरून सतत वाद होत असत. घटनेपूर्वी ३ महिने दोघात वाद झाले होते. त्यावेळी सविता आईकडे राहण्यास गेली. तिने पोलिसात तक्रार दिली होती. त्यामुळे ती राहत असलेल्या आईच्या घरी प्रविण तिला भेटायला गेला होता. तिथे तिने कुऱ्हाडीने त्याच्या मान व डोक्यावर वार प्रविणचा खून केला. पाठीमागे गेलेल्या प्रविणच्या पत्नीने हे प्रत्यक्ष पाहिले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.





