सांगली – सांगली जिल्ह्यातील विटा येथे एका रुग्णालयाचे छत कोसळले असून त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे. ह्या दोंन्ही महिला सख्या बहिणी होत्या. ही घटना विटा येथील लेंगरे रस्त्यावर असलेल्या आशिर्वाद क्लिनिक मध्ये घडली आहे.
अनिता सुरेश माळी (वय ४०) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव असून अलका बबन शिंदे (वय ४५) जखमी महिलेचे नाव आहे. या दोघी बहिणी आशिर्वाद क्लिनिकमध्ये उपचार घेण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी हा प्रकार घडला आहे. दरम्यान, जखमी महिलेस सांगली येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.