पुणे – सोसायटीतील तरुणांना टेरेसवर पतंग उडवून न दिल्याने त्यांनी एका कुटूंबाला मारहाण करत महिलेचा विनयभंग केला. ही घटना कासेवाडी येते घडली. याप्रकरणी दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.
सागर सोमनाथ चव्हाण(25), राजेश बबन पवार, ईश्वर संतोष गायकवाड( सर्व रा.भिमाले संकुल, भवानीपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. यातील राजेश व ईश्वरला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली आहे.
यातील फिर्यादीचे पती आणि 12 व्या मजल्यावरील महिलेने आरोपींना टेरेसवर पतंग उडवू देण्यास नकार दिला होता. याचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादीचा पती आणि सासूला मारहाण केली. यानंतर फिर्यादीचा गाऊन फाडून तीचा विनयभंग केला. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक पांढरे करत आहेत.