Crime News :पतीच्या मारहाणीत जखमी महिलेचा मृत्यू; एक महिन्यानंतर मृत्यूशी झुंज अपयशी
Crime News : यात गीताबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र, सायंकाळच्या सुमारास पतीने गीताबाई पडल्याचा बनाव करीत तिला उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

शिक्रापूर : करंदी (ता. शिरुर) येथील केंदूर रोड ठाकरवस्ती येथे एक महिन्यापूर्वी पतीच्या जबर मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेवर एक महिनाभर रुग्णालयात उपचार सुरु असताना महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
गीताबाई बाळू जाधव, असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. करंदी येथील केंदूर रोड ठाकरवस्ती येथे राहणाऱ्या गीताबाई जाधव या महिलेचे (दि.२०) जुलै रोजी पतीसोबत वाद झाल्यानंतर पतीने गीताबाईला बेदम मारहाण केली. यात गीताबाई या गंभीर जखमी झाल्या होत्या. मात्र, सायंकाळच्या सुमारास पतीने गीताबाई पडल्याचा बनाव करीत तिला उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
त्यावेळी डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती शिक्रापूर पोलिसांना देत महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी महिलेच्या घरी जात कुटुंबीयांची चौकशी केली असता गीताबाई यांना तिच्या पतीने कशानेतरी बेदम मारहाण केल्याचे समोर आले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना गीताबाई बाळू जाधव या महिलेचा अखेर मृत्यू झाला आहे.
वैद्यकीय अहवालानंतर गुन्हा दाखल
करंदी येथील महिलेला मारहाणबाबतची माहिती मिळताच त्याचवेळी आपण कुटुंबीयांकडून माहिती घेतलेली असून आता वैद्यकीय अहवाल तपासून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.





