पुणे जिल्हा | बसमधून पडल्याने महिला जखमी
Updated On:

शिक्रापूर, (वार्ताहर)- कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे बसथांब्यावर प्रवासी बसमध्ये चढत असताना चालकाच्या चुकीमुळे बसमधून खाली पाडून प्रवासी जखमी झाली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे परमेश्वर दत्तात्रय शिंदे या पीएमटी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव भीमा येथील पीएमटी बसथांब्यावर वैशाली गुप्ता या थांबलेल्या असताना समोरून आलेल्या बसमध्ये त्या बसत असताना अचानक चालकाने बस भरधाव वेगाने पुढे नेल्याने वैशाली या तोल गेल्याने पाठीमागील दरवाजातून रस्त्यावर पडल्या.
त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याबाबत वैशाली सच्चिदानंद गुप्ता (वय २१, रा. कोरेगाव भीमा) यांनी शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पीएमटी बस चालक परमेश्वर दत्तात्रय शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




