साक्षी मलिक पराभूत

ऑलिम्पिक ब्रॉंझपदक विजेत्या साक्षी मलिक या भारतीय खेळाडूला 62 किलो गटात नायजेरियाच्या अमिनात अदेनियी हिने 10-7 असे चकित केले. अदेनियीने सुरूवातीपासून या लढतीत आघाडी मिळविली होती. तिच्या आक्रमक खेळापुढे साक्षीचा बचाव निष्प्रभ ठरला. अदेनियीला नंतर उपांत्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे साक्षीला ब्रॉंझपदकाच्या फेरीत संधी मिळाली नाही. 68 किलो गटात भारताच्या दिव्या काक्रन हिला जपानची ऑलिम्पिक विजेती खेळाडू सारा दोशो हिने 2-0 अशा फरकाने पराभूत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.