Dhananjay Munde : …त्याशिवाय दोन मुलांना जन्म देणं शक्य नाही; कोर्टाचा धनंजय मुंडेंना जोरदार झटका

मुंबई : माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आपण पहिल्या पत्नी आहे, त्यामुळे आपल्याला पोटगी द्यावी’ अशी याचिका करुणा शर्मा यांनी दाखल केली होती. मुंबईच्या न्यायालयानं या प्रकरणात करुणा शर्मा यांच्या बाजूनं निकाल दिला होता. आता त्यापाठोपाठ सत्र न्यायालयानं देखील करुणा शर्मा यांना दिलासा देत मुंडे यांना धक्का दिला आहे. Dhananjay Munde-Karuna Sharma |
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच होते, असा निर्वाळा मुंबईतल्या माझगाव कोर्टानं दिला आहे. दोन मुलांना जन्म देणं हे एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, असं कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे करुणा शर्मा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळायला पात्र असल्याचंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असंही कोर्टानं आपल्या आदेशात म्हटलं आहे. Dhananjay Munde |
धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदावलं आहे. करुणा मुंडे यांना दोन लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी आव्हान दिलं होतं. आपल्या याचिकेत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नसल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी केला होता. धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत, असं मत सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. Dhananjay Munde on Karuna Sharma |
करुणा मुंडेंचे कोर्टात पुरावे सादर
यापूर्वी माझगाव कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव मृत्यूपत्र सादर केलं. त्यामध्ये करुणा मुंडे यांच्या नावासमोर पहिली पत्नी तर राजश्री मुंडे यांच्या नावासमोर दुसरी पत्नी असा उल्लेख आहे, असा दावा त्यांनी केला. धनंजय मुंडे यांनी त्यावेळी आपल्याला पहिल्या पत्नीचा दर्जा दिल्याचा करुणा मुंडे यांनी दावा केला आहे. त्याचबरोबर आम्ही २७ वर्ष सोबत राहिलो आहोत. आमचं जॉईंट बँक अकाऊंट आहे. पॉलिसी आहे. परळी पोलिस ठाण्यात माझ्या लग्नाचे पुरावे देखील आहेत, असं करुणा यांनी स्पष्ट केलं. Karuna Sharma |
माझागाव कोर्टाच्या आदेशात नेमकं काय?
- करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच होते – माझगाव कोर्ट
- त्यांनी 2 मुलांना जन्म दिलाय हे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही, माझगांव सत्र न्यायालयाचं निरीक्षण
- धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावताना कोर्टानं ओढलेत तीव्र ताशेरे
- करुणा शर्मा यांना 2 लाख रुपयांची पोटगी देण्याच्या वांद्रे कोर्टाच्या निर्णयाला धनंजय मुंडे यांनी दिलेलं आव्हानं शनिवारी फेटाळलं
- आपल्या याचिकेत करुणा शर्मा यांच्याशी लग्न केलं नसल्याचा होता धनंजय मुंडे यांचा दावा कोर्टाकडून अमान्य
- त्यामुळे करुणा शर्मा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र, कोर्टाचा निर्वाळा
- करुणा शर्मा व त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जाफर यांनी आपल्या आदेशांत म्हटलेलं आहे.





