Winter Session : हिवाळी अधिवेशन 7 ऐवजी 11 डिसेंबरपासून? वाचा सविस्तर….

Winter Session – नागपुरात 7 डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन (Winter Session )आता 11 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मंत्रालयाच्या कॉरिडॉरमध्ये बुधवारी अशी जोरदार चर्चा सुरू झाली. पण संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाने हिवाळी अधिवेशनाच्या तारखेत बदलची चर्चा अफवा असल्याचे म्हटले आहे.
6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन असल्याने विदर्भातील लोक मोठ्या संख्येने मुंबईत येतात. याशिवाय इतरही काही कारणे पुढे करून सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात हिवाळी अधिवेशनाच्या तारखेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना संसदीय कार्यमंत्री पाटील यांच्या कार्यालयाने सांगितले की,
हिवाळी अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतच घेतला जातो. मंत्रिमंडळ आणि कामकाज सल्लागार समितीची बैठक 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सध्या हिवाळी अधिवेशनाची तारीख बदलण्याचा कोणताही प्रस्ताव बुधवारपर्यंत त्यांच्या कार्यालयात आलेला नाही.





