Virat Kohli : ‘दर चार दिवसांनी दाढी रंगवण्याची वेळ आली की…’, विराटने पहिल्यांदाच सांगितलं कसोटी निवृत्तीचं कारण

Virat Kohli 1st Reaction after test retirement : भारतीय स्टार खेळाडू विराट कोहलीने लंडनमध्ये युवराज सिंगच्या ‘फंडरेझर’ कार्यक्रमात आपल्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीबाबत मजेशीर टिप्पणी केली. यावेळी कोहली म्हणाला, “जेव्हा तुम्ही दर चार दिवसांनी दाढी रंगवता, तेव्हा तुम्हाला समजतं की आता निवृत्तीचा काळ आला आहे.” कोहली सध्या लंडनमध्येच राहत आहे. अलीकडेच तो विम्बल्डन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये दिसला, जिथे त्याने तपकिरी रंगाचा सूट घालून स्टायलिश लूक कॅरी केला होता.
त्यानंतर तो तात्काळ युवराजच्या ‘यूवीकॅन’ कॅन्सर फंडरेझर कार्यक्रमात सहभागी झाला. या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट संघ उपस्थित होता. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक गौरव कपूर म्हणाला, “मैदानावर तुमची खूप आठवण येते.” यावेळी रवी शास्त्री, ख्रिस गेल, केविन पीटरसन आणि युवराज सिंग कोहलीच्या शेजारी उभे होते. कोहलीने क्षणभर थांबून मजेशीर उत्तर दिले, “मी दोन दिवसांपूर्वीच माझी दाढी रंगवली आहे. तुम्हाला माहीत आहे, जेव्हा तुम्ही दर चार दिवसांनी दाढी रंगवता, तेव्हा विश्रांतीचा काळ आलेला असतो.”
युवराजच्या इव्हेंटमध्ये विराटने वेधले सर्वांचे लक्ष –
Virat Kohli, Yuvraj Singh, Chris Gayle, Kevin Pietersen and Ravi Shastri together on the stage. 🤯
– A legendary picture! 🐐 pic.twitter.com/ioui0paf3S
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 9, 2025
विराट कोहलीने तत्कालीन मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबतच्या नात्याबद्दलही प्रतिक्रिया दिली. ज्यांच्या काळात कोहलीने भारतीय कसोटी संघाला नव्या उंचीवर नेले. कोहली म्हणाला, “खरे सांगायचे तर, तेव्हा मी त्यांच्यासोबत नसतो, तर कसोटी क्रिकेटमध्ये जे घडले ते शक्य झाले नसते. आमच्यामध्ये जी स्पष्टता होती, ती मिळणे खूप कठीण आहे. क्रिकेटपटूच्या कारकिर्दीत पुढे जाण्यासाठी हेच सर्वकाही असते.”
हेही वाचा – PKL 2025 : प्रो कबड्डी लीगच्या १२ व्या हंगामाचे बिगुल वाजले! ‘या’ तारखेपासून रंगणार सामने
विराट कोहलीकडून रवी शास्त्रींची प्रशंसा –
VIRAT KOHLI ON TEST RETIREMENT. 🗣️
“I just coloured my beard two days ago. You know it’s time when you are colouring your beard every four days”. pic.twitter.com/x8TgqU967X
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 9, 2025
विराट कोहली पुढे म्हणाला, “ते पत्रकार परिषदेत ज्या पद्धतीने प्रश्नांना धैर्याने सामोरे जायचे, ते खूप महत्त्वाचे होते. नाहीतर परिस्थिती वेगळी असती. माझ्या मनात नेहमीच त्यांच्याबद्दल आदर आणि सन्मान आहे, कारण ते माझ्या क्रिकेट प्रवासाचा महत्त्वाचा भाग होते.” यानंतर रवी शास्त्री यांनीही कोहलीच्या प्रशंसेचा प्रतिसाद देताना सांगितले की, गेल्या १५ वर्षांतील सर्वात प्रभावशाली क्रिकेटपटू म्हणजे विराट कोहली आहे.
हेही वाचा – IND vs ENG : ‘त्यांना काही बोलू नका…’, भारताच्या विजयानंतर योगराज सिंगने गंभीरच्या टीकाकारांना खडसावलं
कोहलीचे आभार मानले पाहिजेत – रवी शास्त्री
VIDEO | Here’s what India’s batting icon and former skipper Virat Kohli (@imVkohli) said about his retirement from Test cricket at Yuvraj Singh’s fundraiser event:
“I just coloured my beard two days ago. You know it’s time when you’re colouring your beard every four days.”… pic.twitter.com/kST2EyEhnL
— Press Trust of India (@PTI_News) July 9, 2025
रवी शास्त्री म्हणाले, “तुम्ही विश्वचषक आणि इतर स्पर्धा जिंकता, पण त्याला कसोटी क्रिकेटला पुढील स्तरावर न्यावयाचे होते. एकदा का त्याने यशाचा मंत्र ठरवला, तेव्हा इतरांनाही त्यांचे अनुकरण करावे लागले. आज जर भारत कसोटी क्रिकेटमध्ये या स्तरावर खेळत असेल, विशेषत: त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या तरुण पिढीने, तर त्यांनी कोहलीचे आभार मानले पाहिजेत. अगदी जागतिक क्रिकेटनेही त्याचे आभार मानले पाहिजेत. भारताच्या कसोटी क्रिकेटमधील चांगल्या कामगिरीमुळे पैसा आला आणि बीसीसीआयला त्याचा वाटा मिळाला.”





