Virat Kohli Injury : विराटच्या दुखापतीने RCB ची वाढवली डोकेदुखी, MI विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जाणून घ्या

IPL 2025 Virat Kohli Injury Updates : आयपीएल २०२५ मध्ये चांगली सुरुवात करणाऱ्या आरसीबीला पराभवाचा पहिला धक्का घरच्या मैदानावर बसला आहे. आरसीबीला तिसऱ्या गुजरात टायटन्सकडून दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवासह आरसीबीला आणखी एक धक्का बसला, जेव्हा क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली. या दुखापतीमुळे विराट मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार की नाही? याबाबत आरसीबीच्या चाहत्यांना चिंता सतावत आहे. याबद्दल आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बुधवार, ३ एप्रिल रोजी बंगळुरू आणि गुजरातमध्ये संघर्ष झाला. या सामन्यात बंगळुरूने प्रथम फलंदाजी केली पण संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. स्टार फलंदाज विराट कोहलीचे अपयश हे देखील यासाठी एक कारण होते, जो दुसऱ्या षटकात बाद झाला . यानंतर, जेव्हा क्षेत्ररक्षणाची पाळी आली तेव्हा येथेही विराट कोहलीकडून गचाळ क्षेत्ररक्षण पाहिला मिळाले. यावेळी त्याच्याकडे एक झेल आला नाही, पण एक चेंडू आला, जो आडवताना दुहेरी फटका बसला.
क्षेत्ररक्षण करताना झाली दुखापत –
Virat kohli injury update ❤️
🔺 Flower attended a post-match conference and shared an update that will give a massive relief to the 36-year-old’s avid fans. The RCB head coach remarked, "Virat looks fine, he's okay." 🔻#ViratKohli #RCBVSGT #KKRvSRH #SRHVSKKR #IPL2025 pic.twitter.com/9kVRw4GQeI
— sirf sunil (@sirfsunil22) April 3, 2025
कृणाल पांड्या आरसीबी संघासाठी १२ वे षटक टाकत होता, त्यावेळी गुजरातकडून स्ट्राईकवर साई सुदर्शन होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर सुदर्शनने स्वीप शॉट खेळला. पण डीप मिडविकेटवर उपस्थित असलेला विराट कोहली चेंडू रोखू शकला नाही. यावेळी त्याच्या बोटाला खूप दुखापत झाली आणि तो वेदनेने ओरडताना दिसला. यावेळी चेंडूही चौकारासठी गेला. यानंतर लगेच वैद्यकीय पथक ताबडतोब त्याची तपासणी करण्यासाठी मैदानात पोहोचले. काही काळ वेदनाविरोधी स्प्रे मारल्यानंतर, तो पुन्हा मैदानावर आला आणि सामना संपेपर्यंत क्षेत्ररक्षण करत राहिला.
हेही वाचा – RCB vs GT : आरसीबीविरुद्धच्या विजयानंतर शुबमन गिलने बहिणीचा घेतला बदला? पोस्ट होतेय व्हायरल
कोहली पुढचा सामना खेळू शकणार की नाही?
https://twitter.com/NiteshK8651/status/1907782451654472020
विराट कोहलीची दुखापत किती गंभीर आहे. याबाबत आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी मोठी अपडेट दिली आहे. संघाच्या पराभवानंतर फ्लॉवर म्हणाले की, विराट कोहलीची दुखापत गंभीर नाही आणि तो पुढील सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त असेल. अर्थात, पराभवाच्या निराशेच्या पार्श्वभूमीवर, ही बातमी आरसीबी आणि त्याच्या चाहत्यांना दिलासा देणारी ठरली आहे. कारण आरसीबीचा पुढील सामना ७ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध आहे.





