कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – वळसे-पाटील
Updated On:

पुणे – माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीची मागणी रास्त आहे. या मागणीसह कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
माथाडी कामगारांच्या मेळाव्यात वळसे बोलत होते. त्यावेळी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.





