Pune Traffic update : पुण्यात मगरपट्टा-मुंढवा रस्ता जलमय! कालवा फुटल्याने वाहतूक विस्कळीत; ‘हे’ आहेत महत्त्वाचे पर्यायी मार्ग
Pune Traffic update : हडपसरमध्ये कालवा फुटल्याने मगरपट्टा रस्त्यावर १-२ फूट पाणी साचले आहे.

Pune Traffic update : हडपसर परिसरात कालवा फुटल्यामुळे मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतूक विस्कळीत झाली. सोमवारी सकाळी ही घटना घडली असून, रस्त्यावर एक ते दोन फूट पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली.
मगरपट्टा परिसरात कालवा फुटल्यानंतर पाण्याचे मोठे लोट रस्त्यावर आले. या मार्गाचा वापर सोलापूर आणि अहिल्यानगरकडून ये-जा करणारी वाहने मोठ्या प्रमाणावर करतात. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले.
या घटनेमुळे मुंढवा चौकात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावर साचलेले पाणी किमान १० ते १२ तास राहण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग Pune Traffic update
Pune Traffic update : पुण्यात मगरपट्टा-मुंढवा रस्ता जलमय!
हडपसर वैदूवाडी चौक – शिंदे वस्ती – शिर्के कंपनी रस्ता – जहाँगीर नगर – ताडीगुत्ता – मुंढवा चौक
२३ ॲव्हेन्यू मॉल – सोलापूर रस्ता – काळूबाई मंदिर चौक – बी. टी. कवडे रस्ता – घोरपडी – पिंगळे वस्ती – ताडीगुत्ता – मुंढवा
खराडीहून येणाऱ्यांसाठी: मुंढवा – ताडीगुत्ता – घोरपडी रेल्वे उड्डाण पूल – बी. टी. कवडे रस्ता – हडपसर
मुंढवा – ताडीगुत्ता – जहाँगीरनगर – शिर्के कंपनी – डॉ. आंबेडकर चौक – शिंदे वस्ती – वैदूवाडी – हडपसर
सोलापूर रस्त्याने: १५ नंबर चौक – मांजरी – झेड कॉर्नर – लोणकर वस्ती – केशवनगर – मुंढवा





