विधानसभापूर्वी ‘हा’ बडा नेता हाती घेणार तुतारी? हसन मुश्रीफांना आव्हान देण्याची शक्यता

Kagal Asselmbly | आगामी विधानसभा निवडणूका होण्यापूर्वी राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातच आता भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कोल्हापूरच्या कागलमधील भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये भाजपला शरद पवार मोठा झटका देण्याची शक्यता आहे.
23 ऑगस्टला बोलवलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात समरजीत घाटगे आपला निर्णय जाहीर करु शकतात. गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे हे शरद पवार गटात जातील, अशी चर्चा होती. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत ते तुतारीच्या चिन्हावर कागल मतदारसंघातून अजितदादा गटाच्या हसन मुश्रीफ यांना आव्हान देण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून समरजीत घाटगे आणि शरद पवार गटातील नेत्यांच्या वाटाघाटी सुरु होत्या. शरद पवार गटाने त्यांच्यासमोर तुतारीच्या चिन्हावर कागलमधून लढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. अजित पवार महायुतीत असल्याने कागलची जागा हसन मुश्रीफ यांच्या वाट्याला जाईल. त्यामुळे समरजीत घाटगे यांना संधी मिळणार नसल्याचा अंदाज आहे. यावरून महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. Kagal Asselmbly |
या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने समरजीत घाटगे यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा होती. त्यावर “माझ्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात चर्चा सुरू आहे. परंतु याबाबतच्या ऑफरला मी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. माझ्या उमेदवारीच्या सर्व चर्चाही मी माध्यमांवरच बघत आहे,” असा खुलासा समरजीतसिंह घाटगे यांनी केला होता. Kagal Asselmbly |
दरम्यान, समरजीत घाटगे यांच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्या गटातील नेता म्हणून पाहिले गेले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या गटात समरजीत घाटगे यांनी प्रवेश केल्यास भाजपला फटका बसू शकतो. Kagal Asselmbly |
हेही वाचा:





