Political News : मोठी बातमी..! पंतप्रधान राजीनामा देणार? देशाच्या राजकारणात खळबळ
Political News : जागतिक राजकारणातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे.

Political News : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या राजीनाम्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. द ऑब्झर्व्हरच्या वृत्तानुसार, स्टारमर सोमवारी आपल्या पदत्यागाची घोषणा करून सत्तांतराचा आराखडा जाहीर करू शकतात. मंत्रिमंडळातील सहकारी, सल्लागार आणि कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी पुढे पंतप्रधानपदावर राहणे कठीण असल्याचा निष्कर्ष काढल्याचे या वृत्तात म्हटले आहे. (Political News)
मात्र, ब्रिटिश सरकारमधील सूत्रांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कीर स्टारमर अद्यापही पंतप्रधान म्हणून आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहेत आणि राजीनाम्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. (Political News)
स्वपक्षातील 100 हून अधिक खासदारांचा विरोध
वृत्तानुसार, लेबर पक्षातील 100 हून अधिक खासदारांनी स्टारमर यांनी राजीनामा द्यावा किंवा पदत्यागाची वेळ निश्चित करावी, अशी सार्वजनिक मागणी केली आहे. हे खासदार लेबर पक्षाच्या संसदीय गटातील सुमारे एक चतुर्थांश सदस्य आहेत. (Political News)
![]()
नेतृत्व बदलाची चर्चा
स्टारमर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यासाठी अँडी बर्नहॅम यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला नवे नेतृत्व मिळू शकते, अशी अटकळ ब्रिटिश राजकारणात व्यक्त होत आहे. (Political News)
दहा वर्षांत पुन्हा नेतृत्वबदल?
जर कीर स्टारमर यांनी खरोखरच राजीनामा दिला, तर गेल्या दशकात कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पद सोडणाऱ्या ब्रिटनच्या आणखी एका पंतप्रधानांची नोंद होईल. यापूर्वी डेव्हिड कॅमेरॉन, थेरेसा मे, बोरिस जॉन्सन, लिझ ट्रस आणि ऋषी सुनक यांनीही कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी पद सोडले होते. सध्या महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान कार्यालयाकडून राजीनाम्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. (Political News)




