Municipal Election | राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान येत्या गुरुवारी 15 जानेवारी रोजी होणार आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मात्र निवडणूक निकाल संपूर्ण जाहीर होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. मनपा निवडणुकीसाठी एकावेळी एकाच वॉर्डच्या मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी स्पष्ट होणारे निकालाचे चित्र मध्यरात्रीपर्यंत स्पष्ट होणार की नाही याची खात्री नाही. याच कारणामुळे मनपा निवडणुकीचे निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. सर्वात आधी टपाली मतदान मोजणी होईल. त्यानंतर वॉर्डनिहाय मत मोजणी होईल. जर एका वेळी एकाच वॉर्डची मतमोजणी गृहित धरली तर या प्रक्रियेसाठी मोठा वेळ लागेल. एकाच प्रभागाची मतमोजणीसाठी साधारणत: एक ते दीड तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार, ज्या महापालिकांचे कमी प्रभाग आहेत, तिथले चित्र संध्याकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पण राज्यातील मोठ्या महापालिकांचे निकाल हाती येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. ही प्रक्रिया लांबली तर पोलीस यंत्रणा आणि मतमोजणी केंद्रावर ताण येण्याची शक्यता आहे. याशिवाय कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी जमण्याची शक्यता आहे. Municipal Election | मध्यरात्रीपर्यंत प्रक्रिया लांबण्याची शक्यता दरम्यान, मुंबईत 227 प्रभाग आहेत. त्यासाठी 23 विभाग निवडणूक कार्यालये आहेत. या निवडणूक कार्यालयातंर्गत 8-10 प्रभागांची मतमोजणी प्रक्रिया होईल. एकाच वेळी एकच प्रभाग या पद्धतीने मतमोजणी ग्राह्य धरल्यास 23 विभागात मतमोजणीस उशीर होण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीपर्यंत ही प्रक्रिया लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Municipal Election | हेही वाचा: “रस्त्यावर टिकून रहा..” ; इराणमधील अशांततेदरम्यान रझा पहलवी यांचा मोठा संदेश