Modi Government : मोठी घडामोड..! सहा महिन्यांत मोदी सरकार कोसळणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
Modi Government : मोदी सरकार पुढील सहा महिन्यांत कोसळेल आणि मार्च-एप्रिलपर्यंत देशात पर्यायी सरकार सत्तेवर येईल, असा खळबळजनक दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Modi Government : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार पुढील सहा महिन्यांत कोसळेल आणि देशात पर्यायी सरकार स्थापन होईल, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. (Modi Government)
काय म्हणाले संजय राऊत?
दिल्लीतील आंदोलनासाठी लागू करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि आंदोलकांना रोखण्याच्या कथित प्रयत्नांवर राऊत यांनी प्रश्न उपस्थित केले. दिल्लीच्या सीमा अडवण्यात आल्या असून रस्ते बंद करण्यात आले, तसेच आंदोलनासाठी येणाऱ्या नागरिकांना अडवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. (Modi Government)
लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी सरकारने संवाद साधावा, अशी भूमिका मांडत त्यांनी केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. पोलिसांनी बेकायदेशीर आदेशांचे पालन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. (Modi Government)
एप्रिलपर्यंत सरकार बदलणार, राऊतांचा अंदाज
“हे सरकार टिकणार नाही. पुढील सहा महिन्यांत सरकार कोसळेल,” असा दावा राऊत यांनी केला. मार्च-एप्रिलपर्यंत केंद्रात पर्यायी सरकार स्थापन होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे. (Modi Government)
दिल्लीतील आंदोलनात आपणही सहभागी होणार असल्याचे सांगत राऊत यांनी सरकारला आव्हान दिले. केंद्र सरकार विरोधक आणि आंदोलकांवर दडपशाही करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Modi Government)
फडणवीसांवरही टीका
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. आणीबाणीविरोधातील आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांवर आंदोलनासंदर्भात गुन्हे दाखल होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. हे सरकार गेल्यानंतर सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेद समोर येतील, असा दावाही राऊत यांनी केला. (Modi Government)



