Duleep Trophy 2024 & IND vs BAN Test Series : सध्या भारतात दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy 2024) खेळली जात आहे, ज्यामध्ये टीम इंडियाकडून खेळणारे सर्व भारतीय मोठे स्टार्स खेळाडू खेळताना दिसत आहेत. याशिवाय अनेक अनकॅप्ड खेळाडूही या स्पर्धेत आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. अनकॅप्ड खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी त्यांना टीम इंडियामध्ये संधी मिळण्याच्या दिशेने कुठेतरी घेऊन जात आहे. तर आम्ही तुम्हाला दुलीप ट्रॉफीच्या अशा 2 युवा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियामध्ये समावेश केला जाऊ शकतो.
1. मुशीर खान : मुशीर खान दुलीप ट्रॉफीमध्ये भारत ‘ब’ संघाकडून खेळत आहे. भारत अ विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात मुशीरने पहिल्या डावात फलंदाजी करताना 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 181 धावा केल्या होत्या. या खेळीसह त्याने सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांचा विक्रम मोडला होता. दुलीप करंडक पदार्पणाच्या सामन्यात मुशीर हा किशोरवयीन (20 वर्षाखालील) तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.
यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने जानेवारी 1991 मध्ये गुवाहाटीत दुलीप ट्रॉफीच्या पदार्पणाच्या सामन्यात वेस्ट झोनकडून खेळताना ईस्ट झोनविरुद्ध 159 धावांची इनिंग खेळली होती. आता मुशीरने सचिन तेंडुलकरला चौथ्या क्रमांकावर ढकलले आहे. मुशीरच्या या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुशीरची ही खेळी त्याला भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरू शकते. दरम्यान, मुशीरचा मोठा भाऊ सरफराज खानने या वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले होते.
2. मानव सुथार : दुलीप ट्रॉफीमध्ये मानव सुथार हा भारत ‘क’ संघाकडून खेळत आहे. भारत ‘ड’ विरुद्धच्या सामन्यात सुथारने अप्रतिम कामगिरी केली. सुथारला पहिल्या डावात 1 बळी मिळवण्यात यश आले होते मात्र त्यानंतर त्यानं कामगिरीत सुधारणा करत दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेतल्या. यानंतर तो चांगलाच प्रकाशझोतात आला. तसेच सामन्यात 8 विकेट घेतल्याबद्दल सुथारला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताबही देण्यात आला. मानव सुथार याचे हेच चमकदार प्रदर्शन त्याच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडू शकते.