अनधिकृत फलकांवर मनपा कारवाई करणार का?

नगर – महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत वाढदिवसाचे फलक लावल्याने संबंधितावर मनपाने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. मात्र, आज पुन्हा त्याच ठिकाणी अनधिकृत फलक लावले गेले. मनपा संबंधितावर कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी अशोक साबळे हे प्रभागात गस्त घालत असताना, नगर-औरंगाबाद रस्त्यावरील डीएसपी चौकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत अनाधिकृत वाढदिवसाचे फलक लावले असल्याने प्रभाग अधिकारी यांनी तिघांविरोधात संबंधितांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केला.
मात्र पुन्हा त्याच ठिकाणी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी अनधिकृत फलक लावले असल्याचे समोर आले आहे. याबाबत मनपा गुन्हे दाखल करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत प्रभाग अधिकारी यांना विचारले असता त्यांनी फलकाची परवानंगी घेतली आहे का? याबाबत चौकशी करून परवांनगी घेतली नसेल तर त्यांच्यावर गुन्ह दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.





