Maharashtra CM Change : महाराष्ट्रातला मुख्यमंत्री बदलणार? शिंदे गटातील नेत्यांच्या वक्तव्यांनंतर प्रवीण दरेकरांनी स्पष्टच सांगितलं
Maharashtra CM Change : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.

Maharashtra CM Change : महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असताना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सध्या मुख्यमंत्री बदलण्याचा कोणताही अजेंडा नसल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर महायुतीतील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्ये करताना सावधगिरी बाळगावी, असेही त्यांनी सांगितले. (Maharashtra CM Change)
दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये उत्तम समन्वय आहे. महायुतीतील महत्त्वाचे निर्णय एकत्रितपणे घेतले जातात. त्यामुळे माध्यमांमध्ये वक्तव्य करून कोणी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra CM Change)
दरम्यान, मुख्यमंत्री बदलाबाबत विविध नेत्यांकडून होत असलेल्या वक्तव्यांवरही दरेकर यांनी भाष्य केले. जबाबदार नेत्यांनी अधिकृत भूमिका मांडल्यास त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे; मात्र काही जण प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये करत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी बच्चू कडू, रवींद्र धंगेकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या वक्तव्यांचा उल्लेख केला. (Maharashtra CM Change)
चंद्रकांत रघुवंशी नेमकं काय म्हणाले?
चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, आम्ही ऐकत आहोत की, देवेंद्र फडणवीस केंद्रात जात आहेत. महाराष्ट्राचे केंद्रात नेतृत्व असलेच पाहिजे. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर महाराष्ट्राची धुरा जर कोणाकडे द्यायची असेल तर एकनाथ शिंदे यांचे नाव अग्रेसर आहे. कारण अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी केलेले काम पाहता त्यांचेच नाव अग्रेसर आहे, असे म्हणत चंद्रकांत रघुवंशी यांनी एकंदरीत एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला आहे. (Maharashtra CM Change)
तसेच चंद्रकांत रघुवंशी यांच्या या वक्तव्यावर पुण्यातील शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा भाष्य केले आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले की, मागच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा बघूनच लोकांनी मतदान केले होते आणि त्यामुळेच राज्यात सत्ता आली. एकनाथ शिंदे सध्या शांत बसलेत म्हणजे लवकरच बातमी येऊ शकते, ते मुख्यमंत्री झालेत. कधीही बातमी येऊ शकते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेत, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला. (Maharashtra CM Change)





