Bank Close: ११ सप्टेंबरला बँक बंद राहणार? नेमकं काय आहे कारण?
Bank : पाच दिवसांच्या कामकाजाची मागणी

Bank Close: जर बँक संदर्भात तुमचे महत्त्वाचे काम असेल तर, ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. येत्या ११ सप्टेंबरला बँक बंद राहण्याची शक्यता आहे.
पाच दिवसांच्या कामकाजाचा आठवडा लागू करण्यास होणारा विलंब आणि प्रलंबित निवृत्तिवेतनविषयक मागण्यांसह विविध प्रश्नांवरून ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने ११ सप्टेंबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. (Bank Close)
संप झाल्यास सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सलग तीन दिवसांचा देशव्यापी संपाचा इशारा (Bank Close)
बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सात राष्ट्रीय संघटनांची शिखर संस्था असलेल्या ‘यूएफबीयू’ने या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास २८ सप्टेंबरपासून सलग तीन दिवसांचा देशव्यापी संपाचा इशाराही दिला आहे. हा संप बँकांच्या सहामाही आर्थिक वर्षाच्या समाप्तीच्या कामकाजाच्या काळात होणार आहे. मागण्यांची पाठपुरावा सुरू राखत २६ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाची योजनाही घोषित करण्यात आली.
४ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत पाच दिवसांचा बँकिंग आठवडा, PLI मधील कथित भेदभाव आणि इतर प्रलंबित मागण्यांवर कोणताही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रस्तावित देशव्यापी बँक संपाचा निर्णय कायम ठेवला आहे.
बँका सलग चार दिवस बंद? (Bank Close)
संपाचा दिवस म्हणजेच ११ सप्टेंबर हा शुक्रवार असून, त्यानंतर शनिवार आणि रविवार या दिवशी बँकांना सुट्टी आहे. काही राज्यांमध्ये सोमवार, १४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने अनेक भागांत बँकिंग सेवा सलग चार दिवस विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
पाच दिवस बँकिंग सेवा सुरू ठेवण्याची मागणी (Bank Close)
आठवड्यात सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस बँकिंग सेवा सुरू ठेवावी. सध्या दुसरा आणि चौथा शनिवार वगळता इतर शनिवार बँका सुरू असतात. पाच दिवसांचा आठवडा लागू झाल्याने शनिवार आणि रविवार सुट्टी राहील. त्याची भरपाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामाच्या वेळेत सुमारे ४० मिनिटांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे.
ग्राहकांवर काय परिणाम होऊ शकतो? (Bank Close)
संप झाला तर बँकांच्या शाखांमधील रोख व्यवहार, चेकशी संबंधित कामे, कागदपत्रांची प्रोसेस आणि इतर प्रत्यक्ष बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र ATM, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगसारख्या डिजिटल सेवा सुरू राहू शकतात.
हेही वाचा:





